चित्रपटासाठी अत्याधुनिक कॅमेरा न वापरता ३५ एम एम फिल्मचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 11:52 IST2016-06-07T06:22:05+5:302016-06-07T11:52:05+5:30

 सौंदर्य साठवण्यासाठी ईश्वराने दोन गोष्टींची निर्मिती केली. एक माणसाचे मन आणि दुसरं म्हणजे मानव निर्मित कॅमेरा. माणसाला देवाने प्रथम ...

Use of 35mm film without using a sophisticated camera for the film | चित्रपटासाठी अत्याधुनिक कॅमेरा न वापरता ३५ एम एम फिल्मचा वापर

चित्रपटासाठी अत्याधुनिक कॅमेरा न वापरता ३५ एम एम फिल्मचा वापर

 
ौंदर्य साठवण्यासाठी ईश्वराने दोन गोष्टींची निर्मिती केली. एक माणसाचे मन आणि दुसरं म्हणजे मानव निर्मित कॅमेरा. माणसाला देवाने प्रथम एक मन दिलं आणि त्यानंतर बुद्धी. बुद्धीच्या बळावर माणसाने साधलेली प्रगती आपल्याला ठाऊक आहेच. पण मन ही अशी शक्ती आहे जिचा आजपर्यंत कोणालाही थांगपत्ता - मोजमाप करता आलेला नाही. कला क्षेत्रात वावरणाºया कलावंतांकडे ह्या दोन्ही गोष्टी बेमालून असतात. आणि त्यांच्या बळावर ही मंडळी एक वेगळं भव्य आणि  सुंदर जग क्षणात उभं करून सगळ्यांना चकित करतात. अशा दोन्ही गोष्टींची भली मोठी गाठोडी घेऊन गेली तीन चार दशके नवनव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मराठी चित्रपटसृष्टीचे डोळस दर्शन घडवीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे संवेदनशील सिनेमॅटोग्राफर म्हणजे समीर आठले. त्यांच्या 'नवरी मिळे नवºयाला', 'धूम धडाका', 'खतरनाक', 'वीर सावरकर', 'मासूम', 'काय द्याचं बोला'? ते थेट येत्या १७ जून रोजी महाराष्ट्र धुमधडाक्यात प्रदर्शीत होणाºया नीलिमा लोणारी दिग्दर्शित व निमार्ते शिवम लोणारी यांच्या 'शिवलीला फिल्म्स' निर्मित 'बर्नी' पर्यंत सातत्याने क्रियशन सुरूच आहे. गेल्या तीस / पस्तीस वर्षात वेगवेगळ्या चाकोरीबाहेरील चित्रपटांसोबत नव्या जुन्या विचारांच्या कलावंतांसोबत सतत कार्यरत राहून समीर आठल्येंनी स्वत:ला अगदी तंदुरुस्त ठेवले आहे. त्यांच्या छायाचित्रणात एक वेगळी चमक असून निसर्गघटना टिपण्याची विशिष्ट कला आहे.  एक सळसळती उर्जा त्यांच्यात कायम दिसून येते.'बर्नी' या चित्रपटासाठी त्यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी आजच्या डिजिटल युगातील एक मैलाचा दगड ठरणारी आहे. गोव्याचे अप्रतिम निसर्ग सौदर्य, १९७० चे दशक, आणि पोतुर्गीज ख्रिस्चन संस्कृती अश्या कथानकाला मुळातच एक खोली आहे. आणि हीच गोष्ट अधिक चालेन्जिंग असल्याने त्यांनी या चित्रपटासाठी कोणताही अत्याधुनिक कॅमेरा न वापरता ३५ एम एम फिल्मचा वापर करून आपल्या आपल्या अनुभवाची नेमकी सांगड घातली आहे. दिग्दर्शिका नीलिमा लोणारी यांच्या सोबतच्या उत्तम ट्युनिग मुले ते अधिक सुलभ झाल्याचे ते सांगतात. बनीर्ची मध्यवर्ती भूमिका करणारी तेजस्विनी आणि नीलकांती पाटेकर, राजन ताम्हाणे, सविता मालपेकर, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर ह्या दिग्गजांसोबतच गिरीश परदेशी, भूषण पाटील, किरण खोजे, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे इत्यादी कलावंतांच्या नैसर्गिक अभिनयामुळे संपूर्ण पडदा अधिक आकर्षक झाल्याचे ते सांगतात. तसेच संवाद लेखक सचिन दरेकर, अमृता मोरे,वेशभूषाकार चैत्राली डोंगरे रंगभूषाकार कुंदन दिवेकर  पार्श्वसंगीतकार आदित्य बेडेकर गीतकार श्रीरंग गोडबोले संगीतकार अमितराजने कोरिओग्राफर उमेश जाधव कला दिग्दर्शक अनिल वाट संकलक अभिजीत देशपांडे यांनी बर्नी अधिक सुंदर दिसावी म्हणून आपापले रंग भरून एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी तयार केली असून समीर आठल्यांच्या छायासौंदयार्तून स्वर्गमुखाचे एक अविश्वसनीय सफर घडणार आहे.
 

Web Title: Use of 35mm film without using a sophisticated camera for the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.