'आणीबाणी' मधून उपेंद्र लिमये प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाला, 'माझं वैयक्तिक आयुष्य...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:49 IST2023-07-14T17:49:03+5:302023-07-14T17:49:31+5:30

उपेंद्रचा भावूक झालेला एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

upendra limaye marathi actor next film anibani set to release soon | 'आणीबाणी' मधून उपेंद्र लिमये प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाला, 'माझं वैयक्तिक आयुष्य...'

'आणीबाणी' मधून उपेंद्र लिमये प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाला, 'माझं वैयक्तिक आयुष्य...'

'आणीबाणी' ऐकलं की तो काळ झपकन आठवतो. तसा काळ पुन्हा नको असं अनेकांच्या तोंडून आपसूकच बाहेर येतं. आता मनोरंजनसृष्टीत 'आणीबाणी' लवकरच येत आहे. म्हणजेच काय तर 'आणीबाणी' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होत आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जगताप अशी मोठी स्टारकास्ट सिनेमात आहे. या सिनेमातून अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) बऱ्याच काळाने मुख्य भूमिकेत दिसतोय.

'आणीबाणी'च्या प्रमोशननिमित्ताने उपेंद्र लिमयेने नुकतीच 'लोकमत फिल्मी' ला मुलाखत दिली. तो म्हणाला, 'मला सिनेमाचं स्क्रीप्ट कधी वाचेन असं झालं होतं. तसंच अरविंद माझा आवडता लेखक आहे. खूप वेगळ्या विषयावर हलक्या फुलक्या पद्धतीने तो लिहितो. हसायला लावणारा पण तोच विचार करायला लावणारा असा हा सिनेमा असणार आहे.'

लेकीच्या लग्नात झाला भावूक

लेकीला नवरीच्या रुपात पाहून बापाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. उपेंद्रचा भावूक झालेला एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आयुष्यातल्या त्या क्षणाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'मी खरंतर खूप विरोधात असतो या गोष्टीच्या. माझं वैयक्तिक आयुष्य मी फारसं समोर आणत नाही. मी सोशल मीडियावरही नाही. पण तिच्या मेकअप आर्टिस्टने तो व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल झाला होता. पण लेकीच्या पाठवणीचा तो क्षण होता. आम्ही सर्वांनीच तो एन्जॉय केला होता.'

दिनिशा फिल्म्स निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने दाखवले आहे.  या चित्रपटाच्या दिमाखदार ट्रेलरचे अनावरण कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. 

Web Title: upendra limaye marathi actor next film anibani set to release soon