शॅार्ट अँड स्वीट: हर्षद अतकरीचं ‘मन मतलबी’ गाणं ऐकलंत का? तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 15:50 IST2023-10-05T15:42:48+5:302023-10-05T15:50:38+5:30

Sshort And Ssweet: या सिनेमात अभिनेता हर्षद अतकरी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

upcoming marathi movie Sshort And Ssweet movie first song man matalabi out now | शॅार्ट अँड स्वीट: हर्षद अतकरीचं ‘मन मतलबी’ गाणं ऐकलंत का? तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

शॅार्ट अँड स्वीट: हर्षद अतकरीचं ‘मन मतलबी’ गाणं ऐकलंत का? तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात 'शॉर्ट अँड स्वीट' (Sshort And Ssweet)  या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमातून वडील आणि मुलगा यांच्या नात्यावर भाष्य केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. त्यानंतर आता सिनेमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या गाण्यातून हर्षदचा कॉलेज हॉस्टेल ते घरापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. मात्र, या सगळ्या प्रवासात त्याला अशा काही गोष्टी दिसतात ज्यामुळे तो अस्वस्थ होतो. त्याच्या मनात विचारांचं द्वंद सुरु होतं.

‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणं नुकतंच प्रदर्शित झाले आहे. अभिनेता हर्षद अतकरी याच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर, या गाण्याची रचना मंगेश कांगणे यांनी केली आहे. तर हे हृदयस्पर्शी गाणं नकाश अझीझ यांनी गायलं आहे. 

दरम्यान, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: upcoming marathi movie Sshort And Ssweet movie first song man matalabi out now