'लई झकास' मल्टीस्टारर सिनेमात रंगणार अनोखी प्रेमकहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:18 IST2017-04-19T07:39:53+5:302017-04-19T17:18:01+5:30

लव्ह,अॅक्शन,कॉमेडी,थ्रिलर,ड्रामा,इमोशन,ट्रॅजेडी आणि फुल ऑन एंटरटेंन्टमेंटसह एक अनोखी प्रेमकहानी रूपेरी पडद्यावर  रंगणार आहे.वयाची हाफ सेंचुरी पूर्ण झालेल्या स्वत:ला तरूणाच्या माध्यमातून ...

The unique love story of 'Lie Zakas' multistar movie | 'लई झकास' मल्टीस्टारर सिनेमात रंगणार अनोखी प्रेमकहानी

'लई झकास' मल्टीस्टारर सिनेमात रंगणार अनोखी प्रेमकहानी

्ह,अॅक्शन,कॉमेडी,थ्रिलर,ड्रामा,इमोशन,ट्रॅजेडी आणि फुल ऑन एंटरटेंन्टमेंटसह एक अनोखी प्रेमकहानी रूपेरी पडद्यावर  रंगणार आहे.वयाची हाफ सेंचुरी पूर्ण झालेल्या स्वत:ला तरूणाच्या माध्यमातून एक अनोखी प्रेमकहानी पाहायला मिळणार आहे.'लई झकास' असे या सिनेमाचे नाव असून हा मल्टीस्टारर सिनेमा असणार आहे.बाबू भट यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले असून बाबू भट यांनीच सिनेमाची कथा लिहीली आहे. सिनेमातील कथेप्रमाणे सिनेमाच्या संगीतावर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. सिनेमात एकून पाच गाणी सिनेमातील गाण्याला सचिन पिळगांवकर,सुदेश भोसले,साधना सगरम,वैशाली माडे,कौशिक देशपांडे,शिला गौरीनंदन,श्रीराम कोप्पीकर यांनी सिनेमातील गाणा गायली आहेत.गायकांप्रमाणेच सिनेमात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.संजय नार्वेकर,निशा परूळेकर,मनोज जोशी,नागेश भोसले, निशीगंधा वाड,उदय टिकेकर,सुनील तावडे,संजय कुलकर्णी,भाऊ कदम यांसारखे नावाजलेले चेहरे सिनेमात झळकणार असून या दिग्ग्ज कलाकारांसह मनिषा सिंग आणि एच.मुकेश भट हे दोन फ्रेश चेहरे सिनमात झळकणार आहेत.सध्या सिनेमाचे शूटिंग सुरू असून  मुंबईसह इतर नयनरम्य स्थळांचं दर्शन सिनेमातू घडणार आहे.नावाप्रमाणेच 'लई झकास',लई दिमाखात,लई थाटात सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

सिनेमातील एका गाण्यात भाऊ कदम थिरकताना दिसणार आहे. नेहमीप्रमाणे सिनेमातील भाऊ कदमचा अंदाजही मनोरंजक ठरणार आहे. तसेच सिनेमातील वेगवेळ्या भूमिकांसाठी दिग्दर्शकाने अतिशय मेहनत घेतलेली असून प्रत्येक कलाकराचे पात्र रूपेरी पडद्यावर रसिकांच्या आवडीनिवडी लक्षात घेवून लिहीण्यात आलेली आहेत. वर्षअखेरीस सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकणार असून या सिनेमासह आणखी काही प्रमाचीकहानी मांडणारे सिनेमा झळकणार आहेत. तुर्तास लई झकास प्रेमकहानी रसिकांना कितपत एंटरटेन करेल हे वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.

Web Title: The unique love story of 'Lie Zakas' multistar movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.