सईच्या चाहत्यांनी दिलं अनोखं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 16:58 IST2016-06-28T11:28:58+5:302016-06-28T16:58:58+5:30

मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची आवडती आणि आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नुकताच वाढदिवस झाला. आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला वाढदिवसादिवशी ...

Unique gifts given by fans of Sai | सईच्या चाहत्यांनी दिलं अनोखं गिफ्ट

सईच्या चाहत्यांनी दिलं अनोखं गिफ्ट

ाठी चित्रपट सृष्टीतील सर्वांची आवडती आणि आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नुकताच वाढदिवस झाला. आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला वाढदिवसादिवशी एक अनोख गिफ्ट तिच्या चाहत्यांनी तिला दिले आहे. ड्रीमर्स पी.आर. आणि सईचा आॅफिशिअल फॅनक्लब सईहॉलीक्स यांनी मिळून पुण्याजवळ भोर येथे वृक्षारोपण करून सईचा वाढदिवस साजरा केला. तसेच सईहॉलीक्सच्या नाशिक मधल्या सदस्यांनी सईच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये देखील वृक्षारोपण केले. नुकतेच सई हिने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान याच्या सोबत श्रमदान केले आणि तिच्या या सामाजिक पुढारापासून प्रेरित होऊन, ड्रीमर्स पी.आर. आणि सईहॉलीक्स यांनी वृक्षारोपण करून सईचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवले. त्यांनी जवळ जवळ ५० झाडे लावली आणि नुसती झाडे लावलीच नाही तर भविष्यात त्याची नीट काळजी घेण्याची जबाबदारी देखील घेतली आहे. सईला देखील तिच्या फॅन्सनी अशा प्रकारे साजरा केलेला तिचा वाढदिवस नक्कीच आवडेल.

Web Title: Unique gifts given by fans of Sai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.