शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येकालाच गणवेश घालावा लागतो. काहींना तो गणवेश आवडतो तर ...
गणवेशांची कहाणी सांगणारा गणवेश
r /> शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येकालाच गणवेश घालावा लागतो. काहींना तो गणवेश आवडतो तर काहींना सक्तीने घालावा लागतो. परंतू या गणवेशाची कहाणी ही काही फक्त शाळेपुरतीच मयर्दित आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकिचे आहे. शाळा संपली आता कॉलेजचे वेध लागले अन गणवेशाची कटकट गेली असे जरी असले तरी आपल्याला प्रत्येक वेळी कोणता ना कोणता गणवेश हा घालावाच लागतो. माणुस रिटायरमेंट पर्यंत विविध गणवेश त्याच्यावर चढवीत असतोच. मग कधी तुम्ही पोलिस अधिकारी झालात तर तो युनिफआॅर्म अगदी रुबाबदारपणे अंगावर चढवीताना कॉलर टाईट तर होतेच ना. तरकाहींचा राजकीय गणवेश असतो. असे विविध प्रकारचे गणवेश प्रेक्षकांना अतुल जगदाळे दिग्दर्शीत गणवेश या सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमात महत्वाची भुमिका करणारे अभिनेते किशोर कदम गणवेश बद्दल सांगताना म्हणतात, प्रत्येक माणुस गणवेश परिधान करत असतो. आॅफिसमध्ये येईपर्यंत त्याच्या डोक्यावर विचारांचे ओझे असते पम एकदा का तो आॅफिसमध्ये आला कि त्याचा गमवेश घालतो. गणवेश तोच असतो पण इंटेन्सिटी वेगळी असते अन व्यक्ती गणिक ती बदलत जाते. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला या सर्व गणवेशांची कहाणी समजेल.