प्रिया बापटची अविस्मरणीय ट्रीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 12:43 IST2017-01-15T12:43:22+5:302017-01-15T12:43:22+5:30
कलाकारांचे आयुष्य म्हणजे बिझी शेडयुल्ड असते. त्यांना सतत शुटिंग, कॅमेरा, अॅक्शन, रिअॅक्शन, रिटेक अशा चंदेरी दुनियेतून स्वत: साठी वेळ काढणे ही मुश्किल असते. मात्र या सर्वातून वेळ काढून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट एक झक्कास ट्रीप एन्जॉय केली असल्याचे पाहायला मिळत आहेत

प्रिया बापटची अविस्मरणीय ट्रीप
क ाकारांचे आयुष्य म्हणजे बिझी शेडयुल्ड असते. त्यांना सतत शुटिंग, कॅमेरा, अॅक्शन, रिअॅक्शन, रिटेक अशा चंदेरी दुनियेतून स्वत: साठी वेळ काढणे ही मुश्किल असते. मात्र या सर्वातून वेळ काढून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट एक झक्कास ट्रीप एन्जॉय केली असल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण नुकतेच तिने सोशलमीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने ट्रीप कशा पध्दतीने एन्जॉय केली असल्याचे विविध फोटोंचा कोलाज बनवून व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याचबरोबर तिने एक पोस्ट ही अपलोड केली आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते की, मेघालयची ही ट्रीप खरचं खूप एन्जॉय केली आहे. या ट्रीपच्या माध्यमातून मी साहसी खेळाचा अनुभव ही घेतला आहे. त्याचप्रमाणे या ट्रीपच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले आहे. मला छान संधी दिल्याबद्दल तिने सॅमी या व्यक्तीचे आभारदेखील मानले आहे. तसेच माझ्यासाठी ही ट्रीप अविस्मरणीय असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. प्रिया बापट ही नुकतीच वजनदार या चित्रपटातून पाहायला मिळाली. या चित्रपटासाठी तिने एक दोन नाही तर तब्बल तेरा किलो वजन वाढविले होते. त्यामुळे या चित्रपटासाठी तिचे विशेष कौतुकदेखील करण्यात आले आहे. या चित्रपटात तिच्यासोहत अभिनेत्री सई ताम्हणकरदेखील पाहायला मिळाली. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळाले. सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील यश मिळविले आहे. आता प्रिया पिंपळ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनावर राज्य करणारा अभिनेता दिलीप प्रभावळकरदेखील दिसणार आहेत.