उमेशचा फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:23 IST2016-10-03T07:53:24+5:302016-10-03T13:23:24+5:30

सलमान खानने सिक्स पॅक अ‍ॅबचा ट्रेंड सेट केला आणि संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष त्याच्याकडे वेधले. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच ...

Umesh's Fitness Fund | उमेशचा फिटनेस फंडा

उमेशचा फिटनेस फंडा

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">सलमान खानने सिक्स पॅक अ‍ॅबचा ट्रेंड सेट केला आणि संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष त्याच्याकडे वेधले. आज हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच अभिनेत्यांची आकर्षक बॉडी आणि सिकस पॅक अ‍ॅब्स पाहायला मिळतात. पण आता मराठी चित्रपटसृष्टीतही सिक्स पॅक अ‍ॅबची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण आहे अभिनेता उमेश कामत.  पिळदार शरीरयष्टीतील उमेश कामतचे काही फोटोज सध्या सोशल साईट्सवर चर्चेचा विषय झाले आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब करणारा उमेश पहिलाच अभिनेता आहे. यासंदर्भात उमेशने लोकमत सीएनएक्सशी दिलखुलास गप्पा मारून त्याचा फिटनेस फंडा सांगितला.

 सिक्स पॅक अ‍ॅब करण्याची कल्पना तुला कशी सुचली ?
:- मी खरतर माझ्या फिटनेसची फारच काळजी घेतो. मला व्यायाम करायलाही आवडते. बºयाच दिवसांपासुन सिक्स पॅक अ‍ॅब्स करायचा माझा विचार होता. त्यासाठी मी चार महिन्यांपासुन मेहनत करीत होतो. शैलेश परूळेकर सरांनी यासाठी मला प्रशिक्षण दिले.

 तु कशाप्रकारे मेहनत घेतलीस ?
:- माझ्यासाठी सिक्स पॅक करणे हे एक आव्हानच होते. पण त्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर मी केला नाही. माझे शरीर साथ देईल तेवढाच व्यायाम मी करायचो. पहिल्यांदा तर मी जिभेवर फार कंट्रोल केला. गोड किंवा तेलकट, बाहेरचे पदार्थ खाणं टाळले. प्रिया मला रोज घरचा डबा पाठवायची. जिम मध्ये मी दररोज दोन ते तीन तास व्यायाम करायचो. 

 मराठी चित्रपटसृष्टीत तुझ्या सिक्सपॅकची जोरजार चर्चा सुरु आहे, त्यांच्याकडुन तुला मिळालेली बेस्ट कॉमप्लिमेंट काय होती ?
:- माझे फोटो पाहिल्यानंतर मला इंडस्ट्रीतील बºयाच जणांचे फोन आणि मेसेज आले. सर्वजणच माझ्या बॉडीचे कौतुक करीत होते. तु आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेस. तुझ्याकडे पाहिल्यानंतर आम्हालाही जिममध्ये जाण्याची प्रेरणा मिळतेय. असे जेव्हा मला काही अभिनेत्यांनी सांगितले ती माझ्यासाठी बेस्ट कॉमप्लिमेंट होती. 

 ज्या अभिनेत्यांना सिक्स पॅक करायचे आहेत, त्यांच्यासाठी  तु काय टिप्स देशील ?
__:- कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला पटकन काहीच मिळत नाही. नेहमी दुरदृष्टीचा विचार करायला हवा. त्यामुळे जर सिक्स पॅक करायचे असतील तर वेळ आणि मेहनत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत असे मी सांगीन. त्यासाठी नियमित व्यायाम, जिम, योगा आणि योग्य डाएट करायला पाहिजे. 

 तुझे सिक्स पॅक पाहिल्यानंतर तुला चित्रपटांच्या काही आॅफर्स आल्या का ?
:- हो, मला बºयाच निर्मात्या-दिग्दर्शकांकडुन चित्रपटांसाठी फोन येत आहेत. पण सध्या तरी काही फायनल झाले नाही. मला जर एखादी कथा आवडली तर मी निश्चितच चित्रपट स्वीकारीन. आणि प्रेक्षकांनाही पडद्यावर माझे सिक्सपॅक अ‍ॅब्स पाहायला मिळतील.

Web Title: Umesh's Fitness Fund