प्रिया बापटसोबतचा फोटो शेअर करत उमेश कामत म्हणाला- काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:19 IST2021-04-12T13:11:25+5:302021-04-12T13:19:56+5:30
उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया बापटसोबतचा एका फोटो पोस्ट केला आहे.

प्रिया बापटसोबतचा फोटो शेअर करत उमेश कामत म्हणाला- काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की
उद्या देशभरात गुढीपाडवा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रात नाही, तर विविध राज्यांमध्ये गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृतीत अनेक समृद्धी गोष्टींचा अगदी भरणा आहे. अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट ही गुढीपाडवाचा सण साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया बापटसोबतचा एका फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत उमेश आणि प्रिया दोघे पारंपारिक पोशाखात दिसतायेत. काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की . असं कॅप्शन या फोटोसोबत दिले आहे. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
उमेश आणि प्रिया यांच्या वयात आठ वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षांचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.
सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया आणि उमेश लग्नबेडीत अडकले होते. प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांचे खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.