उमेश कामतचे सीक्स पॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 16:41 IST2016-09-18T11:08:26+5:302016-09-18T16:41:43+5:30
बॉलिवुडप्रमाणेच मराठी कलाकारदेखील सध्या आपल्या सीक्स पॅक बनविण्यावर भर देताना दिसत आहे. कारण बºयाच कलाकारांचा अधूनमधून जीममधील फोटो सोशलमीडियावर झळकत ...

उमेश कामतचे सीक्स पॅक
ब लिवुडप्रमाणेच मराठी कलाकारदेखील सध्या आपल्या सीक्स पॅक बनविण्यावर भर देताना दिसत आहे. कारण बºयाच कलाकारांचा अधूनमधून जीममधील फोटो सोशलमीडियावर झळकत असतात. त्यामध्ये प्रेक्षकांचा लाडका अभिनेता उमेश कामत याचा देखील समावेश आहे. हा अभिनेता नेहमीच सायकलिंग, जीम करतानाचे फोटो सोशलमीडियावर शेअर करत असतो. त्याचे हे फोटो पाहून असेच वाटते की, उमेश हा आपल्या फिटनेसविषयी फार जागृत आहे. त्याने नुकतेच सोशलमीडियावर सीक्स पॅक असलेला फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर हे सिक्स पॅक बनविताना खूपच मेहनत घेतली असून, या मेहनतीला काही मर्यादाच नसल्याचे उमेशने सोशलमीडियावर सांगितले आहे. त्याचबरोबर त्याने ट्रेनर परूरळेकर यांचे देखील आभार मानले आहे. त्याचप्रमाणे उमेशच्या या सीक्स पॅकचे सोशलमीडियावर भरभरून कौतुक होताना दिसत आहे. यामध्ये अभिनेता सुबोध भावे, रवी जाधव, सिध्दार्थ जाधव, अमेय वाघ, शशांक केतकर यांचा समावेश आहे.