उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने असेही एकदा व्हावेसाठी गायली कविता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 13:58 IST2018-03-01T08:28:00+5:302018-03-01T13:58:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत रोज वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. चित्रपटाचे विषय, संकलन, मांडणी आणि दिग्दर्शनाबरोबरच सिनेमातील संगीतातही आज विविध प्रयोग ...

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने असेही एकदा व्हावेसाठी गायली कविता
म ाठी चित्रपटसृष्टीत रोज वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. चित्रपटाचे विषय, संकलन, मांडणी आणि दिग्दर्शनाबरोबरच सिनेमातील संगीतातही आज विविध प्रयोग होताना दिसून येत आहे. चित्रपटाच्या कथानकाला बांधून ठेवण्यास महत्वपूर्ण असलेल्या या संगीताचे एक वेगळेच रूप आपल्याला आगामी 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. झेलू इंटरटेंटमेंटस यांची निर्मिती आणि सुश्रुत भागवत यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'यू नो व्हॉट?' ही कविता अल्पावधीतच सोशल नेट्वर्किंगवर साईटवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या प्रयत्नाने सिनेमातील पार्श्वसंगीताचा सुयोग्य वापर करत पार्श्वसंगीताचे महत्त्व पटवून दिले आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने यांनी म्हटलेली ही कविता वैभव जोशी याने शब्दबद्ध केली असून तिला अद्वैत पटवर्धनने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे.
'यू नो व्हॉट' या कवितेचे गाण्यात रूपांतर न करता त्याचे बोल उमेश आणि तेजश्रीकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने लीलया साधली आहे. विशेष म्हणजे यात उमेश कामतने गिटारदेखील वाजवली असून कवितेचा विचार करून अद्वैतकडून गिटारचे प्रशिक्षण त्याने घेतले. अद्वैत पटवर्धनने कवितेला पार्श्वसंगीत देताना गिटारच्या कॉर्डस अशा वापरल्या आहेत की, ज्या उमेश कामतला स्क्रीनवर व्यवस्थितपणे वाजवता येतील. याबद्दल सांगताना दिग्दर्शक सुश्रुत भागवत सांगतात की, या कवितेच्या चित्रीकरणादरम्यान अद्वैत पूर्णवेळ सेटवर उपस्थित होता. पार्श्वसंगीताचा हा एक वेगळाच प्रकार असून, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ती लोकांसमोर सादर करण्यात आली आहे'. उमेशच्या कल्पनेतली तेजश्री कशी आहे हे दाखवणारी ही कविता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असून अल्पावधीतच या कवितेने सोशल नेट्वर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात उमेश तेजश्री जोडीबरोबरच शर्वाणी पिल्लई हिचीदेखील विशेष भूमिका आहे.
तेजश्री आणि उमेश हे दोघेही मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. पण त्यांनी कधीच एकत्र काम केले नव्हते. या चित्रपटामुळे एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
Also Read : 'आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे