Dharmaveer Movie : अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 10:19 AM2022-05-16T10:19:04+5:302022-05-16T10:23:58+5:30

Dharmaveer Mukkam Post Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे.

Uddhav Thackeray watched Dharmaveer , a film based on late Anand Dighe | Dharmaveer Movie : अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले...

Dharmaveer Movie : अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले...

googlenewsNext

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe)   यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  (Dharmaveer Mukkam Post Thane) या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. काल उद्धव ठाकरे यांनी  सहपत्नीक हा पाहिला. पण, चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. असं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. खुद्द मुख्यमंत्र्यांनी यामागचं कारण सांगितलं आणि त्यांचं उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्व शिवसैनिकांना गहिवरून आलं.

 आयनॉक्समध्ये ‘धर्मवीर’चा खास शो ठेवण्यात आला होता.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी आलेत.  चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. विशेषत: अभिनेता प्रसाद ओक  (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनय फारच जबरदस्त आहे.   प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत. त्यांनी हे सर्व कसं केलं माहित नाही. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. पण मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे.  जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावुक झाले होते . आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत,असं   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


 
शेवटच्या सीनमध्ये काय आहे?
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शेवटच्या 10 मिनिटात आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग कोणत्याही शिवसैनिकाला भावुक करणारा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रसंग पाहण्याचं टाळलं.
‘धर्मवीर’ या चित्रपटाला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.90 कोटी  रूपयांचा बिझनेस केला.
 

Web Title: Uddhav Thackeray watched Dharmaveer , a film based on late Anand Dighe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.