pan style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कोणतेही शुभ काम करताना गणपती बाप्पाचे नामस्मरण केले जाते. कारण कामामध्ये यश मिळो असा त्यामागचा हेतू असतो. हाच हेतू लक्षात घेऊन अभिनेता पुष्कर श्रोत्री याने देखील गणेश आगमनाचा मुहुर्त साधत उबुंटू असे माझ्या आगामी चित्रपटाचे नाव असल्याचे सोशलमिडीयावर सांगितले आहे. अखेर पुष्करच्या चित्रपटाचे नाव काय असणार आहे या प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पुष्करने पूर्णविराम दिला आहे.उबुंटू या चित्रपटासाठी लेखक, दिग्दर्शक आणि निमार्ता म्हणून पुष्करचा हा पहिलाच प्रयत्न असणार असल्याचे पुष्करने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. पुष्कर म्हणाला, मला लहान मुले फार आवडतात. त्यामुळे पहिलाच चित्रपट लहान मुलांसोबत करण्याचे मी ठरविले होते. माझे ही इच्छा उबुंटू या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. हा चित्रपट लहान मुलांवर आधारित आहे. या चित्रपटात दहा मुलांचा समावेश आहे.
या मुलांसोबत काम करताना खरचं खूप मजा आली. या चित्रपटाचे संगीतकार श्रीरंग गोडबोले आणि समीर सामंत यांचे आहेत.