n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">मराठी चित्रपटसृष्टी गाजविणारी अभिनेत्री निवेदिता सराफ तर त्यांची दुसरी ओळख अशोक सराफ यांच्या पत्नी. नुकतेच निवेदिता मराठवाड्यात गेली होती. तिथून पुन्हा मुंबईला ती रेल्वेने परतणार होती. पण तिला रेल्वे स्टेशनवर तब्बल पाच तास नांदेड देवगिरी रेल्वेची वाट पाहावी लागली. यामुळे निवेदिता चांगलीच संतापली. बरं एवढ झालं असते तर पुरे होते, पण तिला रेल्वेमध्ये अतिशय घाण बेडशीटवर झोपावे लागले. शिवाय,तिची पर्स उंदराने कुरतडली. मग वैतागुन अगदी नाईलाजास्तव निवेदिता सीएसटी स्टेशन ऐवजी ठाण्यालाच उतरली. या सर्व गोष्टींचा तिला एवढा त्रास झाला की संतापुन तिने पुन्हा मराठवाड्यात येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
![]()
Web Title: Trouble caused by the train
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.