"झाड हेच सेलिब्रेटी...", असं का म्हणाले सयाजी शिंदे?, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:29 IST2025-10-29T12:25:14+5:302025-10-29T12:29:08+5:30
Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांचं पर्यावरणावरील प्रेम अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी झाड हेच सेलिब्रेटी असल्याचं म्हटलं आहे.

"झाड हेच सेलिब्रेटी...", असं का म्हणाले सयाजी शिंदे?, जाणून घ्या याबद्दल
सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी मराठी चित्रपट व नाटक, तसेच कन्नड, तमीळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान राबविले आहेत. तसेच त्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष संमेलनाचेही आयोजन केले आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत त्यांनी झाड हेच सेलिब्रेटी असल्याचं म्हटलं आहे.
सयाजी शिंदे यांचं पर्यावरणावरील प्रेम अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता त्यांनी अमोल परचुरे यांच्या कॅचअप या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, ''नट म्हणून अजून काय मनात राहिलंय बाबा... भाषा किती झाल्यात... म्हणून मी ते झाडांकडे वळत होतो की जगण्याचं साधन खरंतर तेवढंच आहे. झाड हेच खरं सेलिब्रेटी, आपण कुणी नसतो, आपण कुणी मोठी नसतो. पैसा मोठा नसतो, नाव मोठं नसतं. त्याहीपेक्षा ऑक्सिजन आणि अन्न हे महत्त्वाचं असतं. तुमचं एवढी आहे, एवढीच एक प्रॉपर्टी असते तुमची. ते जातं तेव्हा तुमच्याकडे काय राहतं?''
''अबब हा किती अहंकारी, किती मस्ती...''
ते पुढे म्हणाले की, ''एवढं सिम्पल लाईफ आहे. उगाच कॉम्प्लिकेट करून अहंकाराचे किती पवित्रे बघत असतो रोज... अबब हा किती अहंकारी, किती मस्ती, याला कधी लाईफ कळणार, हा बावळट असाच मरणार...असं सतत लोकांकडे बघितल्यावर वाटतं की काय या बावळटपणाचं करायचं.''