पुष्कराज- नचिकेत उतरले बापाच्या रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 15:30 IST2016-09-14T10:00:55+5:302016-09-14T15:30:55+5:30

                  पुष्कराज चिरपुटकर आणि नचिकेत पूर्णपात्रे सध्या वेगळ््याच मूडमध्ये दिसत आहेत. ...

Topaz- On Nachiket, on the road of father | पुष्कराज- नचिकेत उतरले बापाच्या रस्त्यावर

पुष्कराज- नचिकेत उतरले बापाच्या रस्त्यावर

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
                पुष्कराज चिरपुटकर आणि नचिकेत पूर्णपात्रे सध्या वेगळ््याच मूडमध्ये दिसत आहेत. हे दोघेही रस्त्यावर उतरले आहेत. आता ते रस्त्यावर उतरून काय करतात असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल ना. तर नव्या वेब सिरिजमध्ये आपल्याला हे दोघेही रस्त्यावर उतरून धमाल करताना दिसणार आहेत. अमेय आणि निपुणच्या वेबसिरिज नंतर आपल्याला पुष्कराज आणि नचिकेतची आपल्या बापाचा रस्ता ही नवी वेबसिरिज पाहायला मिळणार आहे. पहिलाच प्रोमो धमाकेदार असल्याने प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी वेगळे आणि मनोरंजनात्मक एपिसोड्स या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळतील. मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक सांगत, लायनन्सवर विश्वास नाही, ब्रेक कशाला मारायला हवा, नो एण्ट्रीमधून घाल गाडी अशा प्रकारची डायलॉगबाजी असणारी ही वेबसिरिज खरच धमाल आणणार असे दिसतय. वेबसिरिजची क्रेझ सध्या जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. तरुणाई वेबसिरिजचे एपिसोड्स मोठ्या प्रमाणावर पाहत असल्याचेच दिसते. अमेय आणि निपुणच्या कास्टींग काऊचला प्रेक्षकांनीच काय पण मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील डोक्यावर घेतले होते. आता या वेबसिरिजमध्ये किती कलाकार रस्त्यावर उतरणार हे तर आपल्याला लवकरच समजेल. 

Web Title: Topaz- On Nachiket, on the road of father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.