‘डिस्को सन्यात टॉम अँड जेरी ची जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 09:56 IST2016-07-29T04:26:35+5:302016-07-29T09:56:35+5:30
‘टॉम अँड जेरी’ यांची जुगलबंदी सर्व वयोगटातील व्यक्तींना ठाऊक आहे. त्या दोघांमधील धावपळ, चिडवाचिडवी, एकमेंकाना आपल्या जाळ्यात अडकवण्याचे प्लॅन्स ...

‘डिस्को सन्यात टॉम अँड जेरी ची जोडी
आपल्या मराठी सिनेसृष्टीत ‘टॉम अँड जेरी’ची जोडी लवकरच पाहायला मिळणार आहे ‘डिस्को सन्या’ या चित्रपटातून. वकाव फिल्म प्रस्तुत 'डिस्को सन्या' या चित्रपटात संजय खापरे आणि पार्थ भालेराव यांची जोडी अगदी टॉम आणि जेरीसारखी आहे. या चित्रपटात संजय खापरे साकारत असलेली भूमिका श्रेयस काळे आणि पार्थ साकारत असलेला डिस्को सन्याची भूमिका प्रेक्षकांचे फूल टू मनोरंजन करणार हे मात्र नक्की आहे. जेरी सारखा सन्या पण श्रेयस काळेंच्या मागे हात धूवून लागला आहे आणि टॉमसारखी गत श्रेयस काळेंची झाली आहे. आम्ही त्यांना का टॉम आणि जेरीची जोडी बोलत आहोत ते तुम्हांला या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन कळेल. सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर निर्मित आणि नियाज मुजावर दिग्दर्शित ‘डिस्को सन्या’ या चित्रपटात अभिनेत्री चित्रा खरे, गौरी कोंगे, अभिनेते सुहास शिरसाठ, उमेश जगताप यांच्याही भूमिका आहेत. टॉम अँड जेरीची हा धमाल-मस्ती अनुभवा ५ ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात.