पर्ण पेठेचा आज वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 13:18 IST2017-02-19T07:48:31+5:302017-02-19T13:18:31+5:30
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री पर्ण पेठे हिचा आज वाढदिवस आहे. या सुंदर आणि गोंडस अभिनेत्रीला चाहत्यांनी ...
पर्ण पेठेचा आज वाढदिवस
पल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री पर्ण पेठे हिचा आज वाढदिवस आहे. या सुंदर आणि गोंडस अभिनेत्रीला चाहत्यांनी सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक कलाकारांनीदेखील सोशलमीडियावर पर्णवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच पर्णला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्यासोबतचे झक्कास फोटोदेखील कलाकारांनी शेअर केले आहे. यामध्ये हेमंत ढोमे, अक्षय्या देवधर, सिध्दार्थ मेनन अशा अनेक कलाकारांचा यामध्ये समावेश आहे.
या अभिनेत्रीने आतापर्यत अनेक नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. रमा माधव या तिच्या ऐतिहासिक चित्रपटामधून तिने आपली अभिनयाची छाप उमटविली आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्याचबरोबर फोटोकॉपी, वायझेड यासारखे अनेक सुपरहीट चित्रपटदेखील तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. नुकताच तिचा बघतोस काय मुजरा कर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या या चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक किल्ल्यांबाबत जनजागृती झाली असल्याचेदेखील पाहायला मिळाले. तिच्यासोबत या चित्रपटात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टंकसाळे, रसिका सुनिल, नेहा जोशी आदि कलाकार पाहायला मिळाले. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट होता.
तसेच तिने रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची जादू निर्माण केली आहे. तिने सत्यशोधक, बेड के नीचे रहनेवाली असे अनेक नाटक सादर केले आहेत. आपल्या या चंदेरी दुनियेच्या प्रवासात पर्ण एक वर्षापूर्वी अभिनेता आलोक राजवाडे याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरली आहे.
![]()