'देवमाणूस' सिनेमातील सिद्धार्थचं काम पाहून भारावली तितिक्षा, म्हणाली-"तुला दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करताना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:30 IST2025-04-25T13:29:43+5:302025-04-25T13:30:43+5:30

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचा 'देवमाणूस' (Devmanus Movie) सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Titiksha Tawde was overwhelmed by Siddharth Bodke's work in the movie 'Devmanus', and said, "When you share the screen with the veterans..." | 'देवमाणूस' सिनेमातील सिद्धार्थचं काम पाहून भारावली तितिक्षा, म्हणाली-"तुला दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करताना..."

'देवमाणूस' सिनेमातील सिद्धार्थचं काम पाहून भारावली तितिक्षा, म्हणाली-"तुला दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर करताना..."

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांचा 'देवमाणूस' (Devmanus Movie) सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. अखेर आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके(Siddharth Bodke)देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दरम्यान सिद्धार्थची पत्नी अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) हिने देवमाणूस सिनेमा पाहिला आणि यातील सिद्धार्थचं काम खूप आवडलं. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

तितिक्षा तावडेने सिद्धार्थसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, सिद्धार्थ मला तुझा खूप अभिमान वाटतो. देवमाणूसमधील तुझी अविश्वसनीय कामगिरी मी विसरू शकत नाही. पडद्यामागे तू घेतलेल्या मेहनतीमुळे तुझा अभिनय रुपेरी पडद्यावर भावतोय. प्रत्येक क्षण, प्रत्येक भावना - खरोखरच तू तुझे सर्वस्व दिले आहे आणि तुझे काम मनावर छाप उमटवून जाते. तुझा खूप अभिमान वाटतो आणि खूप प्रेरणा मिळते. आणि तुला दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना पाहणे हा अनुभव आणखी खास बनवला आहे. देवमाणूस आता प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा सर्वांनी पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.


'देवमाणूस' सिनेमात  भावना, नाट्य आणि थरार यांचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लव फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे लव रंजन व अंकुर गर्ग निर्माते आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Titiksha Tawde was overwhelmed by Siddharth Bodke's work in the movie 'Devmanus', and said, "When you share the screen with the veterans..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.