लक्ष्य मालिकेने ओलांडला हजारचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 10:52 IST2016-02-04T05:22:45+5:302016-02-04T10:52:45+5:30
कोणत्याही मालिकेने हजार भागांचा टप्पा पार करणे म्हणजे हे त्या मालिकेचे यश समजले जाते. व यशाचे सेलिब्रेशन त्या त्या ...

लक्ष्य मालिकेने ओलांडला हजारचा टप्पा
क णत्याही मालिकेने हजार भागांचा टप्पा पार करणे म्हणजे हे त्या मालिकेचे यश समजले जाते. व यशाचे सेलिब्रेशन त्या त्या मालिकेच सेलिब्रेट देखील मोठया उत्साहाने साजरा करतात. याच यशामध्ये आता, लक्ष्य या मालिकेचादेखील समावेश झाला आहे. लक्ष्य या मालिकेने देखील प्रेक्षकांचे लक्ष्य मिळवीत ११०० भाग नुकतेच पूर्ण केले. क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया या क्राईमशी संबंधित असलेल्या हिंदी मालिकांनी जेवढे लोकप्रियता प्राप्त केली आहे. तेवढीच लोकप्रियता या पहिल्या मराठी क्राईम संबंधित मालिकेने लोकप्रियता मिळविली आहे. या मालिकेत आदिती सारंगधर, कमलेश सावंत, रमेश वाणी, परी तेलंग या कलाकारांचा समावेश आहे. तसेच या मालिकेत आठ ते दहा हजार कलाकारांना आपली कला दाखविण्याचा प्लॅटफॉर्म प्रॉप्त झाला. ही मालिका आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शनची आहे.