"हे मायला तर एवढं आहे की...", परभणीतल्या भाषेबाबत संकर्षण कऱ्हाडे भरभरुन बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:44 IST2025-07-24T17:43:55+5:302025-07-24T17:44:33+5:30
Sankarshan Karhade : संकर्षण परभणीचा आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत परभणीतील भाषेबद्दल सांगितले.

"हे मायला तर एवढं आहे की...", परभणीतल्या भाषेबाबत संकर्षण कऱ्हाडे भरभरुन बोलला
संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. संकर्षण परभणीचा आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत परभणीतील भाषेबद्दल भरभरून सांगितले.
आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत संकर्षण म्हणाला की, ''आमच्याकडे करायले जेवायले ते यायलंय. बरं आमच्याकडे स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी नाही मधलंच काहीतरी आहे. म्हणजे हा काय चालू आहे रे ते जेवायले अरे पण ते कोण आहे तो पुरुष आहे ती स्त्री आहे. ते जेवायले आणि एक ना रिलॅक्स... हा यायलो ना अरं यायलो ना म्हणजे ९.३० झाले ना आता. आता मुंबईत जाऊन मी थोडा रेस्टलेस होतो की अरे ९.३० ला तुला मी येतो म्हणलं तर मी ९.२५ पासून मला घाम फुटतो की अरे ती मुलगी काय विचार करेल की हा म्हणला होता की ९.३० ला येतो. ९.३१ झाले अन् परभणीला हां तुला म्हणलं ना बे मायला ९.३०/१० ला यायलो. अरे ९.३०/१० मध्ये ३० मिनिटं झाले ना ते कोणी भरुन काढायचे. रिलॅक्स...''
''परभणीचं पाणी तसं थोडं जड आहे...''
त्याने पुढे सांगितले की, ''परभणीचं पाणी तसं थोडं जड आहे. आता मी फार कमी वेळेला माझं परभणीला जाणं होतं. सणावाराला जाणं होतं. तर मी काय करतो मुंबईच्या पाण्याची सवय लागल्यामुळे बिस्लेरी पितो गेल्यावर याच्यात काही माज नाही. काही नाही. माझा एवढाच उद्देश असतो की परभणीला तीन दिवस राहून आल्यानंतर पुन्हा आपले सातत्याने प्रयोग लागलेले आहेत. मग मी बिस्लेरीचंच पाणी पितो. किंवा कुठलं जे आता बाटलीमधलं असेल ते. एकदा मित्राकडे जेवायला बोलावलं तर बिस्लेरी म्म्मं काय मायला शहाणपणा करायले. अरे कुठे शहाणपणा करायलो तिथे गेल्यावर माझे प्रयोग आहेत. मी इथे आडवा झालो तर तू करणार आहेस का जाऊन प्रयोग म्म मायला. हे मायला तर एवढंय इतकं आहे का ते मायला आहे मला कळत नाही. हा खूप मायला म्म.. तुम्हाला मायला तुम्ही तर.'' संकर्षणने परभणीमध्ये मायला या शब्दाचा कसा सऱ्हास वापर केला जातो, याबद्दल सांगितले.