मिथीला पालकरला ही गोष्ट देते अत्यानंद, सोशल मीडियावर 'तिचा' फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 06:30 IST2019-07-09T06:30:00+5:302019-07-09T06:30:00+5:30
आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं.

मिथीला पालकरला ही गोष्ट देते अत्यानंद, सोशल मीडियावर 'तिचा' फोटो व्हायरल
आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे. 'मुरांबा' या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. पहिल्या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. 'माझा हनीमून'मध्येही तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या मिथीलाने काही दिवसांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवलं. 'कारवाँ' या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले. मिथीला सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.
फॅशनची उत्तम जाण असलेली मिथीला खाण्याची शौकिन आहे. तिच्या खवय्येगिरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांत मिथीला खाण्याचा आनंद लुटत असल्याचं दिसत आहे. तिच्यापुढे सँडविच, आईसक्रिम असल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद सारं काही सांगून जात आहे. खाणं आपल्याला सर्वाधिक आनंद देतो हे तुम्हाला कळलंच असेल अशी कमेंट तिने या फोटोला दिली आहे. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.