मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 07:00 IST2022-03-26T07:00:00+5:302022-03-26T07:00:06+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री आपल्या बोल्ड अंदाजानी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी ग्लॅमरस लूकमुळे. या अभिनेत्री आपल्या बोल्ड अंदाजानी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. त्यांचा हा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूपच भावतो आणि म्हणूनच यांचं नाव मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्रीच्या यादीत येते.
बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती इंडस्ट्रीत छोटी सोनाली कुलकर्णी म्हणून ओळखली जाते. नटरंग, क्षणभर विश्रांती, अजिंठा, झपाटलेला, क्लासमेट्स, मितवा, ग्रँड मस्ती हे तिचे काही चित्रपट आहेत. सोनाली देखील ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.
सई ताम्हणकर
सई ताम्हणकर बऱ्याचदा तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. तिनेसुद्धा तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना थक्क केले आहे. सईने क्लासमेट्स, नो एंट्री पुढे धोका आहे, दुनियादारी, हंटर, धुराळा, गर्लफ्रेंड या चित्रपटात काम केले आहे. सई साडी, वेस्टर्न आउटफिट आणि बिकीनी या सगळ्यामध्येच खूपच ग्लॅमरस दिसते.
प्रिया बापट
प्रिया बापटने मुन्नाभाई एमबीबीएस, काकस्पर्श, टाईम पास 2, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हॅप्पी जर्नी, वजनदार, टाईम प्लीज आणि सिटी ऑफ ड्रीम्स या चित्रपटात काम केले आहे. प्रियाचा अभिनय सुंदर आहेच पण तिचे फोटोही तितकेच ग्लॅमरस असतात. प्रिया साडी आणि वेस्टर्न अशा दोन्हीही आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते.
अमृता खानविलकरला लाडाने इंडस्ट्रीत बरेज जण अम्मू असेही संबोधतात. अमृताने कट्यार काळजात घुसली, राझी आणि नटरंग या चित्रपटात झळकली आहे. मराठी इंडस्ट्रीतल्या बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री अमृता खानविलकर आहे.
नेहा पेंडसे हिने १९९९ मध्ये आलेल्या प्यार कोई खेल नहीपासून करिअरची सुरवात केली. देवदास या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातही तिने काम केले आहे. तिने मे आय कम इन मॅडम, कॉमेडी दंगल, एंटरटेनमेंट की रात, फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा या कॉमेडी शोमध्येही काम केले आहे. बिग बॉस हिंदीच्या १२ व्या सीझनमध्ये नेहाने सहभाग घेतला होता. त्यानंतर भाभीजी घर पर है या मालिकेत तिने सौम्या टंडनच्या जागी काम केले. नुकतीच तिने ही मालिका सोडली आहे. अभिनयासोबतच नेहा उत्तम पोल डान्स करते. स्वतःच्या सोशल मीडियावर ती सतत तिचे हॉट अंदाजातले फोटो टाकत असते.
श्रुती मराठे-
श्रुती मराठेने मराठी आणि तमीळ सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. सनई चौघडे या मराठी चित्रपटातून तिने पदार्पण केले. इंदिरा विझा आणि नान अवन्निलई या तमिळ सिनेमातही ती झळकली आहे. तसेच रमा माधव, तप्तपदी, बंध नायनॉलचे, बुधिया सिंग- बॉर्न टू रन या चित्रपटातही काम केले. श्रुतीने एका पेक्षा एक या डान्स शोमध्येही सहभाग घेतला होता.
तेजस्विनी पंडित-
तेजस्विनी पंडितने खलनायिकेच्या भूमिकेत मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्या या चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका केली होती. त्यानंतर तिने रखेली नावाच्या नाटकात काम केले. त्यानंतर गैर, वावटळ, मी सिंधुताई सपकाळ, तू हि रे, समांतर यातही ती पाहायला मिळाली.
श्रिया पिळगावकर-
श्रिया ही सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आहे. श्रिया एकुलती एक, फॅन आणि मिर्झापूर या प्रोजेक्टसाठी जास्त ओळखली जाते. श्रियाचे ग्लॅमरस फोटो चर्चेत येत असतात.
उर्मिला कानेटकर-
उर्मिला कानेटकर हिने दुनियादारी, शुभ मंगल सावधान आणि ती सध्या काय करते या चित्रपटात काम केले आहे. उर्मिलाही एक कथ्थक डान्सर आहे. ती तिच्या डान्स प्रॅक्टिसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्मिलाही कपड्यांमध्ये सतत एक्सपिरिमेंट करताना दिसत असते. उर्मिलाचे साडीतलेच फोटो इतके सुंदर असतात.
पल्लवी सुभाष-
पल्लवी सुभाषने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. तिने एव्हरेस्ट गरम मसाला, लाइफ बॉय आणि 3 रोजेस अशा जाहिरातीमध्ये तिने काम केले आहे. तिने मराठी, तेलगू, कन्नड, श्रीलंकन या भाषेतही काम केले आहे.