​ये रे ये रे पैसा या चित्रपटातील एका दृश्यासाठी वापरण्यात आले ६० कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:33 IST2017-09-13T09:03:11+5:302017-09-13T14:33:11+5:30

ये रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ...

These are the 60's cameras used for a scene in the film Ray Ray | ​ये रे ये रे पैसा या चित्रपटातील एका दृश्यासाठी वापरण्यात आले ६० कॅमेरे

​ये रे ये रे पैसा या चित्रपटातील एका दृश्यासाठी वापरण्यात आले ६० कॅमेरे

रे ये रे पैसा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करत आहेत. गुरू या चित्रपटानंतर तब्बल दीड वर्षांनंतर संजय जाधव यांचा ये रे ये रे पैसा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गुरू हा चित्रपट संजय जाधव यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे तितकासा चालला नव्हता. पण आता पुन्हा एकदा नव्या जोमाने ते कामाला लागले आहे. या चित्रपटाचे टीजर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या टिजर पोस्टरची चांगलीच चर्चा आहे.
ये रे ये रे पैसा या चित्रपटाच्या चित्रीकरणात कोणतीही कमतरता पडू नये यासाठी संजय जाधव प्रयत्न करत आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटातील एका दृश्यासाठी तब्बल ६० कॅमेरे वापरले आहेत. कोणत्याही दृश्यासाठी दोन-तीन कॅमेरे वापरले जातात. पण संजय जाधव यांनी निर्माते अमेय खोपकर यांच्याकडे एका दृश्यासाठी ६० कॅमेऱ्यांची मागणी केली आणि त्यांची ही मागणी अमेय खोपकर यांनी पू्र्णदेखील केली. हे दृश्य कोणत्या कलाकारावर चित्रीत करण्यात आले हे अद्याप कळले नसले तरी हे दृश्य अफलातून असणार यात काही शंकाच नाही.
ये रे ये रे पैसा या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, आनंद इंगळे, विशाखा सुभेदार, असे अनेक नामवंत कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचा विषय हा वास्तवात असलेल्या सगळ्या विषयांपेक्षा वेगळा आहे म्हणजेच कॉमेडी, लव्ह स्टोरी, थ्रिलर या विषयांमध्ये मर्यदित नसून
नवीन परिभाषा असलेला असेल. 
ये रे ये रे पैसा चित्रपटाची एव्हीके फिल्म्स, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या बॅनरखाली निर्मिती, ओम प्रकाश भट, अमेय खोपकर आणि सुजय शंकरवार यांनी केली आहे. ये रे ये रे पैसा हा चित्रपट पुढील वर्षी ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Also Read : टीम 'दुनियादारी'ची अशीही रियुनियन.. 'दुनियादारी'चा सिक्वेल येणार ?

Web Title: These are the 60's cameras used for a scene in the film Ray Ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.