म्हणून सिध्दार्थ जाधव म्हणतोय,तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं असणंच महत्वाचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 14:47 IST2017-03-06T09:17:25+5:302017-03-06T14:47:25+5:30

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात एनर्जेटिक अभिनेता सिद्धार्थ जाधव हा नेहमीच त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने  रसिकांचे  मनोरंजन करतो.नाटक असो किंवा मालिका प्रत्येक ...

Therefore, Siddharth Jadhav says, "It is as important as you are | म्हणून सिध्दार्थ जाधव म्हणतोय,तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं असणंच महत्वाचं

म्हणून सिध्दार्थ जाधव म्हणतोय,तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं असणंच महत्वाचं

ाठी सिनेसृष्टीतील सर्वात एनर्जेटिक अभिनेता सिद्धार्थ जाधव हा नेहमीच त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने  रसिकांचे  मनोरंजन करतो.नाटक असो किंवा मालिका प्रत्येक माध्यमातून सिद्धार्थने रसिकांच्या  मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव पेक्षा तो रसिकांना आपला सिद्धूच वाटतो.म्हणून त्याचे चाहते त्याला 'सिद्धु' याच नावाने बोलवताना दिसतात. जेव्हा जेव्हा  रसिकांना सिद्धुला भेटण्याची संधी मिळते.तेव्हा मोठ्या आपुलकीने चाहते त्याच्याशी दिलखुलास गप्पा मारताना दिसात. त्याची विचारपुस करतात.आपल्या चाहत्यांना प्रत्यक्षात भेटून सिद्धार्थही त्यांच्यात मिसळून अभिनेता म्हणून नाहीतर त्यांच्यातलाच एक होऊन मस्त दिलखुलास गप्पा मारतो. नुकतेच सिद्धार्थ गेला उडत हे नाटक खूप गाजतंय पण सिद्धार्थ आता म्हणतोय चेहरा क्या देखते हो? हा सिद्धार्थचा आगामी चित्रपट किंवा नाटक असेल असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो.मात्र तसे नसून सिद्धार्थने लिहिलेला ब्लॉग आहे.नुकताच सिद्धार्थने एक ब्लॉग लिहिला आहे आणि सध्या सिद्धूचा हा ब्लॉग सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 'चेहरा क्या देखते हो' या ब्लॉगच्या शीर्षकातूनच सिद्धार्थने काहीतरी जबरदस्त लिहिलं असणार हे कळून येतं. एखाद्या माणसाचं दिसणं किंवा बाह्यरूप आपण किती महत्वाचं मानतो पण तसं नसतं, तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचं असणं किती महत्वाचं असतं हे सिद्धूने त्याच्या ब्लॉगमधून सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इतकंच नव्हे तर त्याने स्वतःच्या कारकिर्दीतील काही अनुभव देखील प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. सर्व वाचकांनी सिद्धूच्या या ब्लॉग अगदी कमी वेळातच भरभरून प्रतिसाद दिला असून त्याने हा प्रेरणादायी लेख लिहिल्याबद्दल त्याचे आभार देखील मानले आहेत. 

केदार शिंदे दिग्दर्शित गेला उडत हे नाटकाला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. पहिल्या प्रयोगापासूनच या नाटकाची खूप  चर्चा होत असून  आता या नाटकाची पसंती पाहता, गेला उडत या नाटकाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर नुकताच अभिनेता सिध्दार्थ जाधव याने सोशलमीडियावर प्रदर्शित केला होता. त्यांच्या या टीझरला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्सही मिळत आहेत. त्याचबरोबर एक नंबर, झक्कास म्हणत या नाटकाचे कौतुकदेखील करण्यात येतंय. 

Web Title: Therefore, Siddharth Jadhav says, "It is as important as you are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.