एक अलबेलाला इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी २७ थिएटरस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 12:46 IST2016-06-17T07:16:32+5:302016-06-17T12:46:32+5:30

भगवान दादाच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला हा चित्रपट आहे. तसेच मंगेश देसाई यांनी या चित्रपटात भगवान दादाची भूमिका ...

There are 27 theaters available for exhibition in Albella in England | एक अलबेलाला इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी २७ थिएटरस उपलब्ध

एक अलबेलाला इंग्लंडमध्ये प्रदर्शनासाठी २७ थिएटरस उपलब्ध

वान दादाच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला हा चित्रपट आहे. तसेच मंगेश देसाई यांनी या चित्रपटात भगवान दादाची भूमिका साकारली आहे. तर विदया बालन या बॉलीवुडची तगडी अभिनेत्री गीता बालीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता देशासहित परदेशात देखील पाहायला मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची लोकप्रियता पाहता, या चित्रपटाला २४ जूनला इंग्लंडमध्ये २७ थिएटरसचा आॅफिशियली रिलीज मिळला आहे. हा मराठीतला पहिलाच असा चित्रपट आहे की, त्याला परदेशात त्याला ऐवढे थिएटरस उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्र मंडळ वगैरे यांनी काही आयोजन केले नाही तर आॅफिशियली ही रिलीज असल्याचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी लोकमत आॅफीस भेटीदरम्यान सांगितले. ते म्हणाले, दिवसाला ३ शो करण्याचे प्लॅनिंग चालू आहे. जरी दोन शो मिळाले तरी ५४ शो होतात. तसेच काही दिवसातच ब्रिटीश संसदेमध्ये देखील या चित्रपटाची ट्रायल आहे. तर अभिनेता मंगेश देसाई म्हणाला, भगवान दादाचे परदेशात देखील खूप सारे चाहते आहे. चित्रपटातील काही गाण्यांना  अबुधाबी, सिंगापूर, साऊथ आफ्रिका, न्युझिलंड, इंग्लंड या ठिकाणी स्थानिक असलेल्या प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: There are 27 theaters available for exhibition in Albella in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.