अखेर सई ताम्हणकरच्या लग्नाबद्दलचं सीक्रेट आलं जगासमोर, या अभिनेत्यासोबत बांधायची होती लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:18 IST2022-03-16T15:18:24+5:302022-03-16T15:18:56+5:30
Sai Tamhankar: सई ताम्हणकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलचे एक सीक्रेट सांगितले आहे. या अभिनेत्यासोबत तिने एक सिनेमा देखील केला असल्याचे तिने यावेळी सांगितले.

अखेर सई ताम्हणकरच्या लग्नाबद्दलचं सीक्रेट आलं जगासमोर, या अभिनेत्यासोबत बांधायची होती लग्नगाठ
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री सई ताम्हणकरचे ( Sai Tamhankar ) नाव घेतले जाते. सई ताम्हणकर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने तिच्या लग्नाबद्दलचे एक सीक्रेट सांगितले आहे. तिने या मुलाखतीत तिला लहानपणासूनच एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न करायचे होते असे सांगितले.
पिंकव्हिलाला सई ताम्हणकरने दिलेल्या मुलाखतीत आजपर्यंत मराठी तसेच हिंदी चित्रपटातील अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगितले. तसेच हंटर चित्रपटात तिने केलेल्या भूमिकेनंतर तिल्या तशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिनं लव्ह- सोनिया चित्रपट तीन वर्षांनी स्वीकारला असल्याचे सांगितले. कारण ती वेगळ्या भूमिकेच्या प्रतीक्षेत असल्याचे देखील तिने सांगितले.
यावेळी सई ताम्हणकर हिने तिचे लग्नाबाबतचे एक सीक्रेट सांगितले, ती म्हणाली की, मी आमिर खानची खूप मोठी फॅन होती. मी आईला बालपणीच सांगितले होते की, मी जेव्हा मोठी होईन तेव्हा याच्याशी लग्न करेल. तिने गजनी चित्रपटात आमिर खानसोबत काम केले आहे. या चित्रपटात काम करण्यासंदर्भात तिला जेव्हा कॉल आला तेव्हा लगेच तिने होकार कळवला होता, असे तिने मुलाखतीत सांगितले.