"दुसरी पण मुलगीच झाली...", प्रिया बापटनं सांगितलं तिच्या नावामागचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:58 IST2025-09-22T13:57:14+5:302025-09-22T13:58:27+5:30
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटचा जन्म झाला त्यावेळी दुसरीही मुलगीच झाल्यामुळे तिची आजी थोडीशी नाराज होती. याबद्दल नुकताच एक खुलासा तिने एका मुलाखतीत केला.

"दुसरी पण मुलगीच झाली...", प्रिया बापटनं सांगितलं तिच्या नावामागचा किस्सा
अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat)ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तिने फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही आपलं स्थान निर्माण केलंय. नुकताच तिचा बिन लग्नाची गोष्ट हा सिनेमा रिलीज झाला. यात तिच्यासोबत तिचा नवरा आणि अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रियाने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. तिने एका मुलाखतीत तिच्या नावामागचा किस्सा सांगितला आहे.
अभिनेत्री प्रिया बापटचा जन्म झाला त्यावेळी दुसरीही मुलगीच झाल्यामुळे तिची आजी थोडीशी नाराज होती. याबद्दल नुकताच एक खुलासा तिने हॉटरफ्लाय दिलेल्या मुलाखतीत केला. प्रिया बापट म्हणाली की, ''माझी मोठी बहिण आहे आणि मी दुसरं अपत्य आहे. मी पण मुलगीच झाले. तर माझी आजी म्हणाली की अच्छा दुसरी पण मुलगीच आहे. माझ्या वडिलांना जाणवलं की दुसरी पण मुलगीच झाली. कदाचित असं असेल की माझ्या वडिलांच्या भावाला दोन मुलगे आहेत आणि मला दोन मुली आहेत. ते लोक माझ्या मुलीचा तिटकारा करतील. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझं नाव प्रिया ठेवलं. कारण मराठीत प्रियाचा अर्थ प्रिय होतो. म्हणजे सगळ्यांसाठी प्रिय आहे. मला खूप अभिमान वाटतो की मी घरातली सगळ्यांची लाडकी आहे.''
'बिन लग्नाची गोष्ट'बद्दल
'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. लिव्ह इनच्या नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य इंगळे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे