नेहा महाजनने म्हणून फेसबुकचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 16:52 IST2017-04-01T11:18:56+5:302017-04-01T16:52:02+5:30

होय, अभिनेत्री नेहा महाजनचे फेसबुक अकाऊंटही व्हेरिफाइड झाले असून तिने लगेच आपल्या मी ही झाले व्हेरीफाईड हो....., म्हणत आपला ...

Thanks to Neha Mahajan for Facebook | नेहा महाजनने म्हणून फेसबुकचे मानले आभार

नेहा महाजनने म्हणून फेसबुकचे मानले आभार

य, अभिनेत्री नेहा महाजनचे फेसबुक अकाऊंटही व्हेरिफाइड झाले असून तिने लगेच आपल्या मी ही झाले व्हेरीफाईड हो....., म्हणत आपला आनंद आपल्या चाहत्यांशी शेअर केला आहे. फेसबुककडून पेज व्हेरिफाइड झाल्यानंतर लगेचच तिने थँक यु फेसबुक असे आभार मानत आपाला आनंद व्यक्त करताच तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. नेहा सतत तिच्या सिनेमाशी निगडीत सगळ्या गोष्टींची माहिती तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. तिचे 5 हजाराहूनही  अधिक फेसबुक फ्रेंड्स आहेत. या फेसबुक पेजद्वारे ती तिच्या फॅन्ससोबत नेहमीच गप्पा गोष्टी करत असते. तिच्या फेसबुक पेजला 68,905 हून अधिक लोकांनी आतापर्यंत लाइक केले आहे.नेहाने 'कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा','नीळकंठ मास्तर','युथ', 'फ्रेंड्स','द पेंटेड हाऊस','मिड नाईट्स चिल्ड्रन'या सिनेमात झळकली आहे. 2016 मध्ये एका न्युड एमएमएस व्हायरल झाल्यामुळे नेहा महाजन प्रकाशझोतात आली होती.तेव्हा पासून नेहा चर्चेत राहण्याचा सिलसिला सुरूच आहे. कधी हॉट फोटोशूट मुळे तर कधी सिनेमामुळे नेहा महाजन सतत चर्चेत असते. सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर मराठी सिनेजगतात आपली विशेष ओळख निर्माण करणारी नेहा महाजन या अभिनेत्रीने नुकताच एक हटके फोटोशुट केला आहे. गडद निळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या फोटोशूटमध्ये नेहाचे व्यक्तिमत्व अधिक उठावदार दिसत असून, नेहाचा हा 'रॉयल' लुक तिच्या चात्यांसाठी देखील विशेष ठरत आहे. आतापर्यत विविधांगी भूमिकेतून  लोकांसमोर आलेल्या नेहाचा या रॉयल फोटोशूटला सोशल साईटवर भरभरून प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Thanks to Neha Mahajan for Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.