तेजस्विनी पंडीतचा तरूणाईला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 18:26 IST2016-12-29T18:22:05+5:302016-12-29T18:26:55+5:30

प्रत्येक तरूणाला चंदरी दुनियेविषयी खूपच आकषर्ण असतं. त्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी प्रत्येक तरूण उत्सुक असतात. तसेच या क्षेत्रात आले ...

Tejaswini Pandit's youth advice | तेजस्विनी पंडीतचा तरूणाईला सल्ला

तेजस्विनी पंडीतचा तरूणाईला सल्ला

रत्येक तरूणाला चंदरी दुनियेविषयी खूपच आकषर्ण असतं. त्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी प्रत्येक तरूण उत्सुक असतात. तसेच या क्षेत्रात आले की यश टिकविणेदेखील खूपच अवघड असते. अशा या सर्व तरूणांना प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने एक सल्ला दिला आहे. कारण तेजस्विनीने नुकतेच एका वेबसाइडवर ब्लॉग लिहीला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून तेजस्विनी सांगते, मला  एक सांगावसं वाटतं कि मला बहुतांश लोक एक प्रश्न आवर्जून विचारतात, ज्या पिढीला अ‍ॅक्टर्स व्हायचं आहे किंवा या क्षेत्रात यायचं आहे त्यांनी काय करायचं  तर या सगळ्यांना मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड सांगेन कि माज्या रायजिंग सुपरस्टार मित्रांनो अ‍ॅक्टिंग मध्ये करियर करणं आणि अ‍ॅक्टिंग मध्ये इंटरेस्ट असणं या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ज्या आताच्या पिढीने समजणे खूप महत्वाचं वाटतं मला. एखादी सिरीयल लीड रोल मध्ये मिळाली की लगेच सातवे आसमॉंपर जाऊ नकात. आज टॉपचे अ‍ॅक्टर्स सुद्धा चांगली कामं मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. काहीजणांकडे चांगली कामं आहेत पण अवॉर्ड्स साठी स्ट्रगल करतात, काहीजणांकडे अवॉर्ड्स असतात पण फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी स्ट्रगल करतात. कारण इथे नुसतं येऊन उपयोग नाही तर तग धरून राहणं महत्वाचं आहे. इथलं ग्लॅमर, फेम नुसतं बघू नकात तर एक सुपरस्टार घडत असताना त्याने घेतलेली मेहनत ही लक्षात घ्या. मी हे सगळं बोलू शकते, कारण माज्या अभिनयाचा प्रवास हा रीळ वापरून शूटिंग करण्यापासून ते २३ रिटेक्स घेणाºया  डिजिटल कॅमेरापर्यंतच्या कलाकारांचा आहे. तेजस्विनीने यापूर्वी तू ही रे, एक तारा, पकडापकडी, लज्जा असे अनेक चित्रपट केले आहेत. 

Web Title: Tejaswini Pandit's youth advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.