याचा आज मुहूर्त करतो आहोत.. म्हणत मराठमोळ्या तेजस्विनी पंडितने केली नव्या इनिंगला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:20 IST2022-05-05T13:30:13+5:302022-05-05T14:20:17+5:30
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली

याचा आज मुहूर्त करतो आहोत.. म्हणत मराठमोळ्या तेजस्विनी पंडितने केली नव्या इनिंगला सुरुवात
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तेजस्विनी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.
आता लवकरच ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनादिली आहे. सिनेमाचा टीझर पोस्ट करत, Creative Viibe ची पहिली चित्रपट निर्मिती " बांबू " याचा आज मुहूर्त करतो आहोत तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद पाठीशी असुदे प्रेमात पडलेल्या, नव्हे प्रेमात लागलेल्या प्रत्येकासाठी 'बांबू' एक युथ एंटरटेनिंग, खुमासदार कथानक असे तिने लिहिले आहे. यापूर्वी तिने प्लॅनेट मराठीसाठी ‘अथांग’ या वेबशोची निर्मिती केली आहे जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि नुकतेच तिने प्रस्तुतकर्ता म्हणूनही काम केले आहे.
याबद्दल बोलताना ती म्हणाली, , विशाल देवरूखकर यांचे चित्रपट नेहमीच तरुणाईला भुरळ पाडणारे असतात. हल्लीच्या मुलांची भाषा, वागणे, जीवनशैली अशा युवा भावविश्वाभोवती फिरणारे त्यांचे चित्रपट तरूणतरुणींना स्वतःच्या आयुष्यासारखे वाटतात. विशेष म्हणजे या चित्रपटातून काहीतरी बोधही दिला जातो. मला आणि संतोषला ही कथा खूप भावली त्यामुळेच निर्मिती पदार्पणासाठी आम्ही ‘बांबू’ची निवड केली.’’