शक्य आहे का.. तुमच्याकडे रागाने किव्हा तुच्छतेने बघणे?, तेजस्विनीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:49 IST2021-12-20T16:20:58+5:302021-12-20T16:49:48+5:30
सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी (Tejaswini Pandit) सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते.

शक्य आहे का.. तुमच्याकडे रागाने किव्हा तुच्छतेने बघणे?, तेजस्विनीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तेजस्विनी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.
सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तेजस्विनीचा असाच एक फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने स्वतः चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ग्रे रंगाच्या साडीमध्ये तेजस्विनी खूपच सुंदर दिसतेय. बघा.. पण प्रेमाने असं कॅप्शन तिने या फोटोंसोबत दिले आहे. तेजस्विनीचे हे फोटोशूट काहीवेळातच व्हायरल झाले आहे. सेलिब्रेटींसह चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. वेगवेगळ्या कमेंट्स चाहते अभिनेत्रीच्या याफोटोंवर करत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिले, शक्य आहे का.. तुमच्याकडे रागाने किव्हा तुच्छतेने बघणे?, तर दुसऱ्या एकाने लिहिले, बघा पण प्रेमाने . मॅडम विषयच गोल केला तुम्ही.. अशा कमेंट्स तेजस्विनीच्या फोटोंवर चाहते करतायेत.
मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे