'दुनियादारी'तील शिरीनच्या भूमिकेबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर तेजस्विनी पंडित सई ताम्हणकरबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 14:17 IST2022-12-22T14:16:57+5:302022-12-22T14:17:43+5:30
Tejaswini Pandit on Sai Tamhankar: दुनियादारी या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने साकारलेली शिरीनची भूमिका मला ऑफर करण्यात आली होती, असा मोठा गौप्यस्फोट तेजस्विनी पंडितने केला. याबरोबरच तेजस्विनीने सईबद्दलही भाष्य केले.

'दुनियादारी'तील शिरीनच्या भूमिकेबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर तेजस्विनी पंडित सई ताम्हणकरबद्दल म्हणाली...
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपट, मालिका, वेबसिरीजमधून तिने हटके भूमिका साकारल्यानंतर आता तेजस्विनी नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. अथांग या वेबसीरिजमधून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने सई ताम्हणकरबद्दल आपलं मत मांडलं.
खरेतर एका मुलाखतीत तेजस्विनी पंडितलासई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दुनियादारी या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरने साकारलेली शिरीनची भूमिका मला ऑफर करण्यात आली होती, असा मोठा गौप्यस्फोट केला. याबरोबरच तेजस्विनीने सईबद्दलही भाष्य केले.
तेजस्विनी म्हणाली की, सई ताम्हणकर आणि मी अनेकदा एकमेकांशी बोलतो. त्यावेळी तिला मी हे अनेकदा सुनवते की सई एकतर तुझ्या भूमिका माझ्याकडे येतात किंवा मग माझ्या भूमिका तुझ्याकडे जातात. अनेकदा तर माझ्याच भूमिका तुझ्याकडे गेल्या आहेत, परंतु त्याला काही करु शकत नाही. पण काहीही असले तरीदेखील सई मला एक मुलगी म्हणून आवडते. ते तिलाही माहितीच आहे.
सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडितने तुहीरे चित्रपटात आणि समांतर वेबसीरिजमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता. तेजस्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.