मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मैदानात, खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:05 IST2026-01-15T14:01:28+5:302026-01-15T14:05:39+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Tejaswini Pandit Post For Raj Thackeray Mumbai Municipal Election 2026 Voting Day | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मैदानात, खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मैदानात, खास पोस्ट शेअर करत म्हणाली...

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार, याचा फैसला आज मुंबईकर करत आहेत. या निवडणुकीत अनेक कलाकारांनी राजकीय भूमिका घेतल्या आहेत. स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तेजस्विनी पंडित हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला पाठिंबा दर्शवत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

तेजस्विनीने राज ठाकरे यांचा एक रुबाबदार फोटो आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर ठेवला आहे. या फोटोला तिने अतिशय अर्थपूर्ण अशा गाण्याच्या ओळींचे कॅप्शन दिले आहे. "मोठी लढाई लढू... मातीसाठी रं गड्या... मनगटाचा जोर लावून... तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा... आसमानीच बळ दावजी…".या ओळींमधून तिने राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. 

२०२६ ची ही महानगरपालिका निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरत आहे. आज म्हणजेच १५ जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुका होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाला जाहीर होईल. २२७ प्रभागांतून रिंगणातील १,७१६ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला १ कोटी ३ लाख मतदार करतील. तब्बल २० वर्षानंतर राज व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

मराठीच्या मुद्द्याभोवती फिरणाऱ्या या निवडणुका ठाकरे बंधूंसह काँग्रेससाठी अस्तित्वाच्या आहेत. या वेळी कुठल्याही परिस्थिती मुंबई पालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. २०२६ च्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाकडून मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठीचं काय होईल?, यावर प्रचार केला. तर भाजपकडून आधी हिंदू-मराठी, मग मुंबईचा महापौर खान होईल, असा प्रचार सुरु केला. 

Web Title: Tejaswini Pandit Post For Raj Thackeray Mumbai Municipal Election 2026 Voting Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.