ही चिमुकली आता बनलीय मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 19:00 IST2019-05-26T19:00:00+5:302019-05-26T19:00:02+5:30
या फोटोत असलेली ही चिमुकली आता खूपच वेगळी दिसते. केवळ तिच्या डोळ्यांवरून ही अभिनेत्री कोण आहे याचा अंदाज आपल्याला लावता येत आहे.

ही चिमुकली आता बनलीय मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री
अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते आपल्या ट्विटर, इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्या खऱ्या आयुष्यातले फोटो, आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो, हॉलिडेजचे फोटो शेअर करत असतात. तसेच या सेलिब्रेटींच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला अनेकवेळा त्यांच्या लहानपणीचे देखील फोटो पाहायला मिळतात. मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीने आपल्या लहानपणीचा एक फोटो खास आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत असलेली ही चिमुकली आता खूपच वेगळी दिसते. केवळ तिच्या डोळ्यांवरून ही अभिनेत्री कोण आहे याचा अंदाज आपल्याला लावता येत आहे.
या फोटोतील ही चिमुकली दुसरी कोणीही नसून अभिनेत्री तेजस्विनी पंडित आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर काही महिन्यांपूर्वी हा तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. या फोटोत ती खूपच गोड दिसत असल्याचे तिच्या फॅन्सने तिला कमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे. पिवळ्या रंगाच्या कपड्यातील या चिमुकलीचे लाल केस तर लोकांना खूपच आवडत आहेत. तसेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव देखील लोकांचे मन जिंकत आहेत.
तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.
त्यानंतर तिने गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा मी सिंधुताई सकपाळ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने यासोबतच तुझं नि माझं घर श्रीमंताचं, १०० डेज यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या तेजस्विनीची आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते.