तेजस नेरुरकरचे गुरु गौतम राजाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 13:34 IST2016-07-19T08:04:14+5:302016-07-19T13:34:14+5:30

शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड असून सुध्दा फोटोग्राफी क्षेत्रात सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून नाव कमावलेला फोटोग्राफर तेजस नेरुरकर याचे सर्वजण कौतुक ...

Tejas Nerurkar's Guru Gautam Raja President | तेजस नेरुरकरचे गुरु गौतम राजाध्यक्ष

तेजस नेरुरकरचे गुरु गौतम राजाध्यक्ष

n style="color: rgb(68, 68, 68); font-family: FontAwesome; font-size: 15px; line-height: 24px;">शालेय जीवनापासून क्रिकेटची आवड असून सुध्दा फोटोग्राफी क्षेत्रात सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून नाव कमावलेला फोटोग्राफर तेजस नेरुरकर याचे सर्वजण कौतुक करत असतात. तेजस नेरुरकरने सेलिब्रिटींचे काढलेले फोटो फार एक्सप्रेसिव्ह असतात.

         

 

आपल्या सर्वांना माहित आहे तेजस नेरुरकर सारख्या उत्तम फोटोग्राफरला प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. 'जसे गुरु तसा शिष्य' हे तेजसच्या फोटोग्राफीच्या कौशल्यावरुन सिध्द होते.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तेजस नेरुरकरची मार्गदर्शक-गुरु गौतम राजाध्यक्ष यांच्याविषयी असलेली भावना जाणून घेऊयात.

“प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष सरांच्या मार्गदर्शनाखाली मी फोटोग्राफीचे धडे गिरवले. फोटोग्राफी ही मला सरांमुळेच अगदी सहज सोपी वाटते. त्यांच्यामुळेच मला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.”

       

 तेजस नेरुरकरने फोटोग्राफीतील या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ‘माझे सर- गौतम राजाध्यक्ष’ हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात गौतम राजाध्यक्ष सरांविषयीच्या आठवणी आणि तेजसने टिपलेले विविध क्षेत्रातील मान्यवरांचे फोटो पाहायला मिळतील

Web Title: Tejas Nerurkar's Guru Gautam Raja President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.