​​तेजश्री प्रधानने दिले तिच्या आयुष्यातील 'या' खास व्यक्तीला सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 10:52 IST2017-04-26T05:22:16+5:302017-04-26T10:52:16+5:30

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या व्यक्तिरेखेमुळे तेजश्री प्रधान हे नाव घराघरात पोहोचले. तेजश्री प्रधानने या ...

Tashashree Pradhan gave surprise to 'this' special person in her life | ​​तेजश्री प्रधानने दिले तिच्या आयुष्यातील 'या' खास व्यक्तीला सरप्राइज

​​तेजश्री प्रधानने दिले तिच्या आयुष्यातील 'या' खास व्यक्तीला सरप्राइज

णार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या व्यक्तिरेखेमुळे तेजश्री प्रधान हे नाव घराघरात पोहोचले. तेजश्री प्रधानने या मालिकेनंतर ती सध्या काय करते या चित्रपटात एक दमदार भूमिका साकारून ती एक सशक्त अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले. आज तेजश्री प्रधानचे हजारो चाहते आहेत.  
तेजश्रीच्या आयुष्यात सध्या एक खास व्यक्ती असून या खास व्यक्तीला तिने नुकतेच एक छान सरप्राइज दिले आहे. तेजश्रीच्या आयुष्यातील ही व्यक्ती दुसरी कोणी नसून तिची लाडकी मैत्रीण सुरूची अडारकर आहे. सुरूचीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती का रे दुरावा या मालिकेमुळे नावारूपाला आली. गेल्या काही वर्षांपासून सुरूची आणि तेजश्री या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. सुरूचीचा नुकताच वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाला तेजश्रीने तिला खूपच छान सरप्राइज दिले. तेजश्रीने सुरूचीसोबतचा एक फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर टाकला असून सुरूचीचा वाढदिवस तिने कसा सेलिब्रेट केला हे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. या पोस्टमध्ये तेजश्री म्हणते, सुरूची तुला सरप्राइज देण्यासाठी तुझ्यासोबत दिवसभर बोलायचे नाही हे लक्षात ठेवणे हे माझ्यासाठी खूप मोठे टास्क होते. माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. आपण कायचम एकमेकांबरोबर असेच राहू...
सुरूची आणि तेजश्री यांचा हा फोटो एखाद्या हॉटेलमधील आहे. या फोटोत या दोघीही खूप सुंदर दिसत असून त्यांच्या निखळ हास्यातून मैत्रीच्या अतूट नात्याची नक्कीच कल्पना येत आहे. दोन अभिनेत्री या चांगल्या मैत्रिणी असू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे या दोघांची मैत्री ही सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरली आहे. 

suruchi adarkar and tejashree pradhan

Web Title: Tashashree Pradhan gave surprise to 'this' special person in her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.