टांझानियात होणार वाघाची शिकार? दबक्या पावलाने पोहोचलं हरिण; भावंडांचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 04:30 PM2023-06-04T16:30:02+5:302023-06-04T16:31:53+5:30

मराठी गाण्याची क्रेझ भारतातच नाही तर थेट टांझानियात जाऊन पोहोचली आहे.

tanzania siblings kili paul and neema paul did reel on famous marathi song | टांझानियात होणार वाघाची शिकार? दबक्या पावलाने पोहोचलं हरिण; भावंडांचा Video व्हायरल

टांझानियात होणार वाघाची शिकार? दबक्या पावलाने पोहोचलं हरिण; भावंडांचा Video व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर आजकाल गाणी, रील्सची क्रेझ असते. बघावं तेव्हा कोणतं ना कोणतं गाणं आणि त्यावरचं रील व्हायरल होत असतं. असंच एक मराठी गाणं सध्या अनेकांच्या तोंडात बसलेलं असेल. तो गाणं म्हणजे 'दबक्या पावलांनी आली, माझी मालकीण झाली, एका लाघाटी शिकार, एका हरिणीने केली'. आता तुम्ही सुद्धा वाचताना हे गाणं अगदी सुरात म्हटलं असणार. तर या गाण्याची क्रेझ भारतातच नाही तर थेट टांझानियात जाऊन पोहोचली आहे.

होय. टांझानिया मधल्या किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) या बहिण भावांचे रील्सचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. फक्त बॉलिवूडच नाही तर इतर भाषेतील गाण्यांवर, व्हायरल रील्सवर ते त्यांचं एक रील बनवतात. भाषा थोडीसुद्धा समजत नसली तरी अगदी परफेक्ट असे एक्सप्रेशन्स देऊन ते डान्स, रील, डायलॉग म्हणत असतात. आता 'दबक्या पावलांनी आली' या व्हायरल झालेल्या मराठी गाण्यावरही रील बनवण्याचा मोह त्यांना आवरलेला दिसत नाही.  गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी, फेटा असा मराठमोळा लुक किलीने पॉलने केला आहे. तर त्याची बहीण नीमा पॉलने निळ्या रंगाचा लेहेंगा, दागिने परिधान केले आहेत. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

'अ मास्टरपीस सॉंग' असं कॅप्शन देत त्याने हे रील पोस्ट केले आहे. तसंच परफेक्ट एक्सप्रेशन्सही दिले आहेत. हा व्हिडिओ पाहून मराठी प्रेक्षक तर भलतेच खूश झालेत. काही दिवसांपूर्वीच या भावंडांनी 'बहरला मधुमास' या सध्याच्या व्हायरल गाण्यावर रील केले होते. मराठी गाणी सुद्धा सातासमुद्रापार जाऊन लोकप्रिय होत असल्याचं बघून मराठी लोकांना अभिमान वाटतोय.

Web Title: tanzania siblings kili paul and neema paul did reel on famous marathi song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.