'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं 'लॉकडाउन लग्न', म्हणतेय - नवीन सुरूवात..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 19:18 IST2021-05-14T19:17:53+5:302021-05-14T19:18:20+5:30
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेतून प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली.

'स्वराज्य रक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं 'लॉकडाउन लग्न', म्हणतेय - नवीन सुरूवात..!
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील संभाजी महाराज आणि इतर महत्वाच्या पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्रं देखील अतिशय प्रभावी आणि लोकप्रिय ठरले होते. या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेतून प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली.या भूमिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर आता ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच तिने याबाबत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सांगितले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड 'लॉकडाउन लग्न' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे.या चित्रपटाचा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पोस्टर लाँच करण्यात आला. याबाबत तिने इंस्टाग्रामवर सांगितले आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गणपती बाप्पा मोरया..१४ मे रोजी अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त....छत्रपती संभाजी महाराज जयंती.... याच शुभमुहूर्तावर माझ्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात..
तसेच पुढे तिने फोटो शेअर करत लिहिले की, नवीन प्रोजेक्ट, नवीन चित्रपट 'लॉकडाउन लग्न'. नवीन सुरूवात.
'लॉकडाउन लग्न' चित्रपटाचे दिग्दर्सन सुमीत संघमित्रा करणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक करत आहेत. तर निनाद बत्तीन व तरबेज पटेल सहनिर्मिती करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच लंडनमध्ये सुरूवात होणार आहे.
प्राजक्ता गायकवाडच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नांदा सौख्यभरे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत झळकली. तसेच तिने आई माझी काळूबाई या मालिकेत काम केले आहे. मात्र काही दिवसांनी ती मालिकेतून बाहेर पडली. त्यानंतर तिच्यातील आणि या मालिकांच्या निर्मात्यांसोबतचे वादविवाद समोर आले होते.