‘चिमणी चिमणी’ ला स्वप्नील जोशीचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 16:37 IST2016-05-11T11:07:35+5:302016-05-11T16:37:35+5:30
भन्साळी प्रॉडक्शनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क़… गुपित आहे साक्षीला’ या रोमँटिक, ससपेन्स, थ्रिलर चित्रपटाची चर्चा तर आता सगळीकडेच होत ...

‘चिमणी चिमणी’ ला स्वप्नील जोशीचा आवाज
या चित्रपटाचं अमितराज यांचं संगीत असलेलं आणि आदर्श शिंदेच्या आवाजातलं ‘चिमणी चिमणी’ हे दुसरं गाणं नुकतच प्रदर्शित झालं. या गाण्यातली विशेषता म्हणजे स्वप्नील जोशीचा पण आवाज या गाण्यातून ऐकायला मिळणार आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटातील सर्वच कलाकार पियुष रानडे, स्नेहा चव्हाण, आरती केळकर, जयवंत वाडकर, कस्तुरी वावरे आणि अमिराजने देखील यांच्याही आवाजात हे गाणं आहे. ‘चिमणी चिमणी’ या गाण्याचे बोल सचिन पाठकने लिहिले आहे. हे गाणं एकाच शॉटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, तर अर्थात सर्व कलाकारांच्या या घेतलेल्या मेहनतीला प्रेक्षक नक्कीच दाद देतील.
या कार्यक्रमा दरम्यान मिडीयाने ‘चिमणी चिमणी’ या गाण्याशी संबंधित अमितराज, निलेश मोहरिर, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, स्वप्नील जोशी व ‘लाल इश्क़… गुपित आहे साक्षीला’ च्या टीमशी संवाद साधला. ‘चिमणी चिमणी’ या गाण्याचा टिझर पाहा... पूर्ण व्हिडीयोसाठी तुम्हांला थोडीशी वाट पाहावी लागेल. पण वाट बघितल्याचा परिणाम नक्कीच गोड असेल कारण ‘चिमणी चिमणी’ हे गाणंच इतकं धमाल आहे की नक्कीच आवडेल.