स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीतने बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 16:28 IST2017-02-21T10:58:41+5:302017-02-21T16:28:41+5:30

आज शहराच्या विविध ठिकाणी सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांचे लाडके कलाकारदेखील मोठया उत्साहाने मतदान ...

Swapnil Joshi and Tejaswini Pandit have voted the right to vote | स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीतने बजावला मतदानाचा हक्क

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीतने बजावला मतदानाचा हक्क

शहराच्या विविध ठिकाणी सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांचे लाडके कलाकारदेखील मोठया उत्साहाने मतदान करताना दिसत आहेत. सकाळपासून कलाकारांची मतदान केलेल्या फोटोंची सोशलमीडियावर गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रुती मराठे, आर्या आंबेकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, सुनिल बर्वे, ऋतुजा बागवे, स्वाती चिटणीस, सायली संजीव, पुष्कर श्रोत्री अशा अनेक कलाकारांनी मतदान केल्यानंतरचे फोटो सोशलमीडियावर अपलोड केले आहेत. त्याचबरोबर मतदान करण्याचे आवाहनदेखील आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले आहे. या सर्व कलाकारांच्या फोटोमध्ये प्रेक्षक आवर्जुन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारे  स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीत या कलाकारांच्या फोटोचा शोध त्यांचे चाहते करत होते. मात्र आता त्यांच्या चाहत्यांची ही उत्सुकता संपली आहे.


      
            कारण नुकतेच स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीतने आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे. स्वप्नील आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबत आपली ही मतदानाची जबाबदारी पार पाडली आहे. कारण त्याने नुकताच परिवारासोबतचा झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर आम्ही मतदान केले, तुम्हीही करा असा असे आवाहनदेखील स्वप्नीलने केले आहे. तर तेजस्विनीदेखील आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते, फरक पडतो, मतदान करा अशा पध्दतीने कलाकारांनी आपल्या सुंदर फोटोसहिंत जनजागृतीदेखील केली आहे. तसेच प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीनेदेखील नुकतेच मतदान केले आहे.



     
         महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे यांनीदेखील एकत्रित झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. अशा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व मराठी कलाकार मोठया प्रमाणात मतदानाचा हक्क बजाविताना दिसत आहेत. म्हणूनच कलाकारांसहित प्रत्येक नागरिकाने मतदान करणे हे कर्तव्य आहे. आपले एक मत शहराचा विकास करू शकतो. म्हणूनच देशाच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 





Web Title: Swapnil Joshi and Tejaswini Pandit have voted the right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.