सावनी रविन्द्र गाणार आयटम साँग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 12:11 IST2017-02-27T06:41:37+5:302017-02-27T12:11:37+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत गायिका सावनी रविन्द्र हिने आपल्या आवाजाने प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. तिने आतापर्यत मराठीमध्ये एक से एक ...
.jpg)
सावनी रविन्द्र गाणार आयटम साँग?
म ाठी चित्रपटसृष्टीत गायिका सावनी रविन्द्र हिने आपल्या आवाजाने प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. तिने आतापर्यत मराठीमध्ये एक से एक गाणे ऐकण्यास मिळाले आहे. त्याचबरोबर तिचे तामिळ गाणेदेखील हिट असल्याचे दिसत आहे. आता मात्र गायिका सावनी रविन्द्र तिच्या चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचे कळत आहे. हो, कारण सावनी लवकरच एक आयटम साँग गाणार असल्याचे समजत आहे. ती हे आयटम साँग एका चित्रपटासाठी गाणार आहे. पण ती हे गाणे कोणत्या चित्रपटासाठी गाणार आहे हे अदयापदेखील कळाले नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना यासाठी आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. पण एक आयटम साँग प्रेक्षकांना कल्ला करायला मिळणार हे नक्की.
सावनीचे नुकतेच एक तामिळ गाणं प्रदर्शित झाले आहे. तिचे हे पहिलं तामिळ गाणं आहे. विशेष म्हणजे, तिचे हे पहिले तामिळ गाणे खूप दिवसांपूर्वी रेकॉर्ड झाले होते. त्यानंतर तिने अनेक गाणी तामिळमध्ये गायली. पण तिचे रेकॉर्ड झालेले हे पहिले तामिळ गाणे आता प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे सध्या ती आनंदात पाहायला मिळत आहे. वेन्निलविन सालईगलिल असे या गाण्याचे बोल आहेत. तिचे हे गाणे सोशलमीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा पध्दतीने सावनीने ही मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मराठी मालिकांच्या शीर्षकगीतांनादेखील आवाज दिला आहे. होणार सून मी या घरची अशा अनेक मालिकांचा समावेश आहे. या मालिकेचे शीर्षकगीत आज ही प्रेक्षक विसरले नाहीत.