सुयशने केले चाहत्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 10:44 IST2016-06-07T05:14:53+5:302016-06-07T10:44:53+5:30
नुकतेच अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कोणी आपल्या सोसायटीमध्ये, घराच्या बाल्कनीत, घराजवळील परिसरात आणि ...

सुयशने केले चाहत्यांना आवाहन
ुकतेच अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कोणी आपल्या सोसायटीमध्ये, घराच्या बाल्कनीत, घराजवळील परिसरात आणि अंगणात अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला. तर सामान्य माणसांनाच नाही तर सेलिब्रिटींनादेखील पर्यावरणाचे भान असते हे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सुयश टिळक याच्या कृतीतून जाणविले. सुयश हा पर्यावरणवादी असून, त्याने आतापर्यंत ४० ते ४५ झाडे लावली आहेत. तसेच पुढील वर्षापर्यंत याही पेक्षा जास्त झाडे लावण्याचा संकल्प त्याने केला आहे. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्याने आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे की, सध्याची भीषण परिस्थिती पाहता आपल्याला पर्यावरणासाठी एक पाउल पुढे टाकणे गरजेचे आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे वाढणारे तापमान, दुष्काळ आणि पाऊस कमी पडणे यांसारख्या समस्यांना आपण तोंड देत आहोत. यासाठी आपण एकमेकांना दोष देत बसण्यापेक्षा आपणच सुरुवात करून शक्य तितकी झाडे लावून त्यांची योग्य काळजी घेतली तर भविष्यात ते आपल्यासाठीच फायदेशीर ठरेल. आपण लावलेल्या झाडांना मोठे होताना तसच त्यांना फळ-फुले येताना बघण्यात जो आनंद असतो तो मनाला सुखावणारा असल्याचे मत त्याने व्यक्त केले. तसेच चाहत्यांना पर्यावरण वाचविण्याचे आवाहनदेखील केले.