म्हणून सुव्रत जोशी पडला वसईच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:27 IST2018-11-20T12:23:44+5:302018-11-20T12:27:19+5:30
मराठी अभिनेता सुव्रत जोशीने इन्स्टाग्रामवर एका फोटो शेअर केला आहे. या फोटोला सुव्रतने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे.

म्हणून सुव्रत जोशी पडला वसईच्या प्रेमात
मराठी अभिनेता सुव्रत जोशीने इन्स्टाग्रामवर एका फोटो शेअर केला आहे. या फोटोला सुव्रतने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. "डोक्याला शॉट" मधल्या एका गाण्याच्या शूट साथी दोन दिवस वसई मधे आहे आणि इथे "डोक्याला शांती" मिळते आहे. वसई किती सुंदर आहे! शांत,रम्य, समृद्ध आणि बहुसांस्कृतिक! कुठल्याही रस्त्यावर दोन मिनिटं चाललं तरी गोव्यात आल्यासारखं वाटतं. मुंबई पासून इतकं जवळ असूनही मुंबईच्या बचबचीतून अलिप्त राहिलय असं वाटतं!
यासिनेमात सुव्रतसोबत प्राजक्ता माळीसुद्धा असणार आहे. काही दिवसांपूर्वीने तिने सोशल मीडियावर सिनेमाची घोषणा केली होती. डोक्याला शॉट' या सिनेमाची निर्मिती अ विवा इनेन प्रोडक्शन व उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. सुव्रत आणि प्राजक्ताची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत.
'दिल दोस्ती दुनियादारी' ही मालिकेतून सुव्रतने रसिकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याने मालिकांसह काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसला. यावेळीही त्याचे दोन्ही लूक पाहायला मिळाले. याशिवाय रंगभूमी आणि सिनेमातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सध्या सुव्रतची भूमिका असलेले अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. यातील त्याची भूमिकाही नाट्यरसिकांना भावते आहे. लवकरच त्याचे नवं नाटक रंगभूमीवर येत असून त्याच्या या आगामी नाटकाचे नाव शाही पहारेदार असं आहे.