नवरा असावा तर असा...! सुव्रत जोशी बनला पत्नी सखी गोखलेसाठी शेफ, See Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 12:08 IST2019-05-18T12:04:55+5:302019-05-18T12:08:58+5:30
सुव्रत जोशी व सखी गोखले यांचा विवाह गेल्या महिन्यात ११ एप्रिलला पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला.

नवरा असावा तर असा...! सुव्रत जोशी बनला पत्नी सखी गोखलेसाठी शेफ, See Photo
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी व सखी गोखले यांचा विवाह गेल्या महिन्यात ११ एप्रिलला पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांचे लग्न एप्रिल महिन्यात चर्चेचा विषय बनला होता. आता काही दिवसांपूर्वी सखीने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली ज्यात सखीसाठी सुव्रत काही पदार्थ बनवित होता.
सुव्रतचा जेवण बनवतानाचा फोटो सखी गोखलेने सोशल मीडियावर शेअर करून सुलाचा स्वयंपाक असा हॅशटॅगही दिला. या फोटोत सुव्रत मन लावून जेवण बनवताना दिसतो आहे.
२०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली. या मालिकेत काम करत असतानाच सुव्रत व सखी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलू लागल्याचे बोलले जात होते. मात्र काही दिवसांनंतर ते दोघे सगळीकडे एकत्र दिसू लागले.
इतकेच नाही तर त्यांचे सोशल मीडियावरील फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र त्यांनी या वृत्ताला कधीच दुजोरा दिला नाही.
सखी गोखले शिक्षणासाठी लंडनला गेली होती. त्यादरम्यान त्या दोघांमधील प्रेम सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इतकेच नाही तर खुद्द सुव्रतने सखीला भेटण्यासाठी लंडन गाठले होते. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली होती.
त्यातच सखीने सोशल मीडियावर स्पिनस्टर्स पार्टीचे फोटो शेअर केला आणि मग सुरू झाली त्या दोघांच्या लग्नाची चर्चा. परंतु, सखीचा फोटो पाहूनही ते दोघे खरंच लग्न करणार आहेत की नाही, हे चित्र देखील स्पष्ट झाले नव्हते. मग, सोशल मीडियावर एकानंतर एक मेहंदी सेरेमनी व लग्नाचे फोटो पहायला मिळू लागले आणि अखेर ११ एप्रिलला ते लग्नबेडीत अडकले.