हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:35 IST2025-04-27T13:34:45+5:302025-04-27T13:35:09+5:30
'झापुक झुपूक' सिनेमाचा दुसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. सिनेमा हिट झालाय की प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवलीय. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे वाचून जाणून घ्या.

हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले?
'झापुक झुपूक' सिनेमाची ( zapuk zupuk movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात सूरज चव्हाण (suraj chavan) प्रमुख भूमिकेत आहे. सूरज हा प्रसिद्ध रील स्टार म्हणून नावारुपास आला. पण नंतर मात्र बिग बॉस मराठी सीझन ५ चं विजेतेपद जिंकून सूरजने सर्व महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलं. याच मंचावर केदार शिंदेंनी सूरजला घेऊन सिनेमा काढणार असल्याचं जाहीर केलं. अखेर केदार यांनी दिलेला शब्द पाळला आणि सूरजला घेऊन 'झापुक झुपूक' हा सिनेमा बनवला. हा सिनेमा हिट झालाय की फ्लॉप झालाय, हे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे सांगतील.
'झापुक झुपूक' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
sacnilk ने दिलेल्या अहवालानुसार, 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी २४ लाखांची कमाई केली. याशिवाय दुसऱ्या दिवशीही 'झापुक झुपूक' सिनेमाने २४ लाखांची कमाई केली. अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये 'झापुक झुपूक' सिनेमाने ४८ लाखांची कमाई केलीय. आज रविवार असल्याने या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 'झापुक झुपूक' निमित्ताने सर्व नवोदित कलाकारांसोबत केदार शिंदेंनी सिनेमा बनवलाय. एकूणच ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांना तो खूप आवडल्याचं दिसतंय.
'झापुक झुपूक' सिनेमाविषयी
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमात सूरज चव्हाण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत पायल जाधव, मिलिंद गवळी, दिपाली पानसरे, जुई भागवत हे कलाकार पाहायला मिळत आहेत. सिनेमाची गाणी प्रेक्षकांमध्ये आधीच हिट झाली आहेत.