कबड्डी या मातीतल्या खेळावर रंगलेला चित्रपट 'सूर सपाटा' प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:30 AM2019-03-22T06:30:00+5:302019-03-22T06:30:00+5:30

अनेक दजेर्दार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप त्याचप्रमाणे यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील.

Sur sapat Marathi Movie On Kabaddi | कबड्डी या मातीतल्या खेळावर रंगलेला चित्रपट 'सूर सपाटा' प्रदर्शित

कबड्डी या मातीतल्या खेळावर रंगलेला चित्रपट 'सूर सपाटा' प्रदर्शित

googlenewsNext

'सूर सपाटा' आज होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसादही दिला आहे. आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे. प्रत्येक श्वासागणिक पाहणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा मातीतला खेळ म्हणजे कबड्डी. 

कबड्डी... कबड्डी... कबड्डी... म्हणत साखळी मारणाऱ्या कबड्डीपटूसोबत पाहणाराही त्यात गुंतत जातो. हाच मातीतला खेळ आज आंतरराष्टीय स्तरावर पकड घेताना दिसतोय. अशातच निर्माते जयंत लाडे आपल्या लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि या बॅनरद्वारे 'सूर सपाटा' हा मराठी चित्रपट घेऊन आले आहेत. ७० एम एमवर रंगलेल्या मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा'ची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत चांगलीच रंगली असून चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांची मने जिंकली आहेत. या निमित्ताने  'सूर सपाटा'च्या संपूर्ण टीमने लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. 

निर्माते जयंत लाडे सांगतात, चित्रपटाची कथा कबड्डीपटूंच्या भोवताली गुंफली आहे. सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवण्यात शिक्षक यशस्वी होतात का? ह्या मुलांचा एक सामान्य विद्यार्थी ते कबड्डीपटू म्हणून झालेला प्रवास किती जोखमीचा असेल? त्या मुलांच्या आयुष्यात कबड्डीमुळे होणारे बदल त्यांच्या आयुष्याला कुठली कलाटणी देतात? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणारं आहे. 'पेईंग घोस्ट' या विनोदी चित्रपटानंतर लाडे ब्रोज् फिल्म्सचा 'सूर सपाटा' हा दुसराच चित्रपट आहे. त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टरची रचनासुद्धा कलात्मक केली असून मातकट रंगछटा गावाकडील खेळांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. शिवाय व्हीएफएक्सने चित्रपटाच्या फ्रेम्स अधिक खुलण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.  सध्या सर्वत्र चर्चा आहे ती या चित्रपटातील कलाकारांची. या गुलदस्त्यातील सर्व नावं समोर आली असून हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे, नेहा शितोळे याची वर्णी लागली आहे. या पार्शवभूमीवर रंगणारा 'सूर सपाटा'चा सामना अटीतटीचा होणार आहे हे नक्की. 

उपेंद्र लिमये चित्रपटातील सेटवरच्या गमतीजमती सांगताना म्हणाला, "अतिशय वांड पण तितकीच हुशार मुलं चित्रपटाच्या निमित्ताने यादरम्यान मला भेटली. सिनेमाची कथा इतकी सुंदर आहे, की मी या चित्रपटाकरिता त्वरित होकार दिला. आशयघन चित्रपटात मिळालेली कोणतीही भूमिका असो, जर ती कम्फर्ट झोनच्या बाहेर असेल तर साकारायला मजा येते." 

अनेक दजेर्दार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप त्याचप्रमाणे यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन करलकर,सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद ताबंडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील. किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे 'सूर सपाटा'ला माजी कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार विजेते मा. श्री. शांताराम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून ३०० राष्ट्रीय कबड्डीपटूंचाही या चित्रपटात सक्रिय सहभाग यात रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्या लेन्समधून चित्रित करण्यात आला आहे.  
 

Web Title: Sur sapat Marathi Movie On Kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.