प्रियंका चोप्राच्या चित्रपटात सुप्रिया पाठारे ही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 13:02 IST2017-02-02T07:22:57+5:302017-02-02T13:02:45+5:30

सध्या बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण यापूर्वी तिने  मराठी ...

Supriya Pathare in Priyanka Chopra's movie? | प्रियंका चोप्राच्या चित्रपटात सुप्रिया पाठारे ही?

प्रियंका चोप्राच्या चित्रपटात सुप्रिया पाठारे ही?

्या बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण यापूर्वी तिने  मराठी चित्रपट निर्मितीमध्येच पदापर्ण केले. काही दिवसांपूर्वीच तिचा व्हेटिंलेटर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियंका चोप्राने मराठी गाणेदेखील गायिले आहे. तिचे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. आता याच चित्रपटानंतर प्रियंका आणखी एक मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास सज्ज झाली आहे. काय  रे रास्कला असे या चित्रपटाचे नाव आहे. 
     
         या  चित्रपटात मुख्य भूमिकेत गौरव घाटणेकर झळकणार आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र आता या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सुप्रिया पाठारेदेखील झळकणार असल्याचे समजत आहे. या अभिनेत्रीची या चित्रपटात काय भूमिका असणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. 
                   
             या चित्रपटाचा नुकताच मुहुर्त पार पडला, यावेळी मधु चोप्रा, दिग्दर्शक गिरीधरन स्वामी, गौरव घाटणेकर, कुनिका सदानंद आदि कलाकार उपस्थित होते. मात्र प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रियंका चोप्रा स्वतः उपस्थित नव्हती. मात्र तिने या मुहुर्तावेळी  व्हिडीयोद्वारे ह्काय रे रास्कला च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. तर हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशी आशादेखील तिने व्यक्त केली आहे. पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित काय  रे रास्कला सिनेमाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांनी केली आहे. संगीता स्वामी आणि डॉ. सत्यशील बिरदार हे या  चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. चला तर प्रियंकाच्या या आगामी मराठी चित्रपटाची वाट पाहूया

Web Title: Supriya Pathare in Priyanka Chopra's movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.