​ सनीने घेतली ओबामांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:45 IST2017-01-22T08:15:03+5:302017-01-22T13:45:03+5:30

  'लायन' या हॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या बालकलाकार सनी पवारने नुकतीच अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेतली. ...

Sunny took a gift from Obama | ​ सनीने घेतली ओबामांची भेट

​ सनीने घेतली ओबामांची भेट

  &
#39;लायन' या हॉलिवूड चित्रपटात काम केलेल्या बालकलाकार सनी पवारने नुकतीच अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सनीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले आहे.'लायनहार्ट अभियाना'चा दूत बनलेल्या सनी पवारने व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ओबामांची भेट घेतली. भारतातील मुलांना आर्थिक सहाय्य आणि सुविधा देण्यासाठी हे अभियान चालवले जाते. 'लायन' चित्रपटात सनी पवारने अभिनेत्री निकोल किडमॅनने दत्तक घेतलेल्या मुलाची भूमिका साकारली आहे.'लायन' चित्रपटात रॉनी मारा आणि ब्रिटीश अभिनेता देव पटेल यांच्या भूमिका आहेत. भारतीय अभिनेत्री दिप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी, प्रियंका बोस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या देखील यात भूमिका आहेत. आपल्या भावासह रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला पाच वषार्चा गरीब सरू हा मुलगा चुकून रेल्वेमध्ये झोपतो आणि गाडी सुटते. जाग येते तेव्हा तो खूप लांब पोहोचलेला असतो. अशा प्रकारे  तो कोलकात्याला पोहोचतो. त्याचा भाऊ शोध घेतो पण सापडणे अशक्य. कोलकात्याच्या रस्त्यावर पाच वर्षाचा  सरू भटकत असतो. जगण्यासाठी खूप संघर्ष त्याला करावा लागतो. त्यानंतर एक आॅस्ट्रेलियन कुटुंब त्याला दत्तक घेते. २५ वषार्नंतर तो आपल्या हरवलेल्या कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरूवात करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. गार्थ डेव्हीस यांनी 'लायन'चे दिग्दर्शन केले आहे. 'लायन' हा चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटींग भारतात आणि आॅस्ट्रेलियात करण्यात आले आहे.

Web Title: Sunny took a gift from Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.