सनी पवार दिसणार 'या' मराठी सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:00 IST2018-10-26T15:59:54+5:302018-10-28T06:00:00+5:30
चिप्पा ही एका मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे, ज्याला त्याच्या दहाव्या वाढदिवसाला दीर्घकाळापासून दूर असलेल्या त्याच्या वडिलांचे पत्र मिळते. तो आपले रस्त्यावरील घर सोडून काही आणखी गोष्टींचा शोध घेण्याचे ठरवतो.

सनी पवार दिसणार 'या' मराठी सिनेमात
रस्त्यावर राहणा-या मुलांच्या आकांक्षांविषयी भाष्य करणारी चिप्पा ही कथा आहे. कोलकातामधल्या एका हिवाळी रात्रीत त्याने स्वतःसाठीच निर्माण केलेल्या आनंददायी जगात घेऊन जाणा-या प्रवासाची ही कथा आहे. प्रेम व्यक्त करणारा आणि जगभरात वाढणा-या मुलांच्या चिरंतन कथांना आणि चैतन्याला सलाम करणारा हा चित्रपट आहे. चिप्पाची भूमिका सनी पवार साकारणार आहे.
“लायन” चित्रपटात देव पटेलची लहानपणीची भूमिका साकारणा-या सनी पवार याला “समीक्षकांचे पुरस्कार- सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार,एएसीटीएतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेता, आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखनीय ग्रँड ज्युरी पुरस्कार, आणि बाल कलाकार पुरस्कार” अशा विविध पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आणि अनेक पुरस्कार मिळाले.
चिप्पा ही एका मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे, ज्याला त्याच्या दहाव्या वाढदिवसाला दीर्घकाळापासून दूर असलेल्या त्याच्या वडिलांचे पत्र मिळते. तो आपले रस्त्यावरील घर सोडून काही आणखी गोष्टींचा शोध घेण्याचे ठरवतो. चित्रपट एका रात्रीमध्ये घडलेल्या घटनांना सादर करतो. यामध्ये चिप्पाने त्याच्या वडिलांशी असलेल्या बंधांचा शोध घेण्यासाठी केलेल्या सुंदर व घटनापूर्ण प्रवासाचा समावेश आहे. सनीसोबत चंदन रॉय सन्याल, मसूद अख्तर, सुमीत ठाकूर आणि माला मुखर्जी यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. मामी
चित्रपट महोत्सवात हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे.
रामानुज दत्ता हे या चित्रपटाचे छायाचित्र दिग्दर्शक (सिनेमॅटोग्राफर) असून मानस मित्तल यांनी एडिटिंग केले आहे. सिरील दि हेज यांनी संगीत दिलेले असून सुकांता मजुमदार यांची ध्वनीरचना आहे.